मुंबई: अभिनेता दबंग खान सलमान सध्या आपल्या आगामी 'किक' या चित्रपटाला घेवून खूप चर्चेत आहे. किकमध्ये सलमान खान आणि रणदीप हुडा दरम्यान एक पाठलाग करण्याचा सिन आहे. हे दृश्य शूट करणं आतापर्यंतंचं बॉलिवूडमधील सर्वात लांब दृश्य आहे.
'डर' या शाहरुख खानच्या चित्रपटात सनी देओल आणि शाहरुखमधील एक दृश्य हे आतापर्यंतचं बॉलिवूडमधील सर्वात लांब पाठलाग करणारं दृश्य होतं. मात्र आता शाहरुखचा हा रेकॉर्ड सलमान आपल्या 'किक' चित्रपटानं तोडेल.
किकमधील हे दृश्य जुन्या दिल्लीतील जामा मस्जिद आणि इतर अनेक भागांमध्ये चित्रित केलं गेलंय. जिथं ते घरांच्या छतावरून धावतांना दिसतील. याचं शूटिंग सलमाननं पाच दिवसांमध्ये पूर्ण केलं. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सलमानला बघण्यासाठी तिथं खूप गर्दी झाली होती. त्यामुळं शूटिंगसाठी उशीर लागत होता. 'किक' येत्या 25 जुलैला रिलीज होतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.