सलमानने कॅटरिनाला दिला होता इशारा

गेल्या काही दिवसांपासून रणबीर-कॅटरिनाच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी सलमानमुळे या दोघांचा ब्रेकअप झाल्याची खबर मिळाली होती. 

Updated: Feb 17, 2016, 08:36 AM IST
 सलमानने कॅटरिनाला दिला होता इशारा title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून रणबीर-कॅटरिनाच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी सलमानमुळे या दोघांचा ब्रेकअप झाल्याची खबर मिळाली होती. 

कॅटरिना आणि रणबीर सहा वर्ष एकत्र राहिल्यानंतर आता वेगळे झालेत. मात्र जेव्हा कॅटरिना सलमानसोबत रिलेशनशिपमध्ये होती तेव्हाच तिने रणबीरला डेट करणे सुरु केले होते. 

मीडिया रिपोर्टनुसार जेव्हा ही बातमी सलमानला समजली तेव्हा सलमान रागाच्या भरात मध्यरात्री कॅटरिनाच्या घरी पोहोचला. ही घटना २००९मधील आहे. यावेळी सलमान नशेत होता. त्याने कॅटरिनाला समज दिली की रणबीरला तिने डेट करु नये. 

SpotboyE वेबसाईटनुसार सलमान कॅटरिनाच्या घरी पोहोचल्यानंतर तिच्यावर आधी ओरडला मात्र त्यानंतर आपल्याला कॅटने सोडून जाऊ नये अशी विनवणी सुरु केली. दोघांमध्ये वादावादी सुरु होती. यावेळी सलमानचा मॅनेजर आणि ड्रायव्हरने यात हस्तक्षेप करत सलमानला तेथून घेऊन गेले. याचमुळे कॅटरिना आणि रणबीर यांच्या ब्रेकअपला सलमान जबाबदार असल्याचे बोलले जातेय.