आश्चर्यकारक : दुबईत पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत

तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण, जिथे पाण्याच्या थेंबालाही पैसे मोजावे लागतात त्या दुबईत पावसानं कहर माजवलाय. पूरामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय.  

Updated: Mar 10, 2016, 12:59 PM IST
आश्चर्यकारक : दुबईत पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत title=

नवी दिल्ली : तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण, जिथे पाण्याच्या थेंबालाही पैसे मोजावे लागतात त्या दुबईत पावसानं कहर माजवलाय. पूरामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय.  

पावसामुळे अनेक शाळा बंद आहेत... रस्त्यांवर साचलेल्या पाण्यात लोक आणि गाड्या अडकून पडल्यात... हे चित्र दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी नाही तर चक्क दुबईमध्ये दिसतंय. 

बुधवारी, अबुधाबी आणि दुबईला पावसामुळे सर्वाधिक फटका बसला. यामुळे, ९ मार्च रोजी अबुधाबी एअरपोर्टही बंद ठेवण्यात आलं होतं.

परंतु, गुरुवारी मात्र पावसाचा अंदाज थोडा फार बदलताना दिसला. पावसामुळे यूएईमध्ये दैनंदिन कामंही विस्कळीत झाली होती.