डिंडिम पेंग्विन दरवर्षी ८ हजार किमींचा प्रवास करुन त्याला भेटायला येतो

आपल्या प्रियजनांना भेटण्यासाठी लोक मैलोंचा प्रवास करतात मात्र एक पेंग्विन आपल्या जवळच्या माणसाला भेटण्यासाठी दरवर्षी तब्बल ८ हजार किलोमीटरचा प्रवास करुन येतो. 

Updated: Mar 10, 2016, 10:19 AM IST
डिंडिम पेंग्विन दरवर्षी ८ हजार किमींचा प्रवास करुन त्याला भेटायला येतो title=

रिओ दी जानेरो : आपल्या प्रियजनांना भेटण्यासाठी लोक मैलोंचा प्रवास करतात मात्र एक पेंग्विन आपल्या जवळच्या माणसाला भेटण्यासाठी दरवर्षी तब्बल ८ हजार किलोमीटरचा प्रवास करुन येतो. 

पेंग्विनचा हा जवळचा व्यक्ती जाओ पेरिरा डिसूझा एक वृद्ध मच्छिमार आहे. डिंडिम असं या पेंग्विनचं नाव आहे. डिंडम दरवर्षी ८ हजार किमीचा प्रवास करुन डिसूझा यांना भेटायला येतो. 

२०११मध्ये डिंडिम जखमी अवस्थेत किनाऱ्यावर आढळला होता. ड़िसूझा यांनी डिंडिमवर उपचार केले. त्याची प्रकृती त्याला पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. मात्र तेव्हा तो गेला नाही. तब्बल ११ महिने तो डिसूझा यांच्याकडे राहिला. नवीन पंख आल्यानंतर तो मात्र त्याच्या घरी परतला

तो निघून गेल्यानंतर परत येईल याची आशाच नव्हती. मात्र तो पुन्हा आला. तो जूनमध्ये डिसूझा यांना भेटायला येतो आणि फेब्रुवारीमध्ये परत जातो. गेल्या चार वर्षांपासून तो हे करत आहे. पेंग्विनचे माणसाप्रती असलेले प्रेम पाहून खरंच भारावून जायला होते.