भारताविरुद्ध युद्धासाठी पाकिस्तानची 'न्युक्लिअर' रणनीती - चौधरी

पाकिस्ताननं पुन्हा एकदा भारताला आपल्या न्युक्लिअर हत्यारांची धमकी दिलीय. भारताच्या 'कोल्ड स्टार्ट डॉक्टरिन'ला सडेतोड उत्तर देण्यासाठी पाकिस्ताननं छोट्या न्युक्लिअर हत्यारांची निर्मिती केलीय, असं विधान पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाज चौथरी यांनी केलंय. 

Updated: Oct 20, 2015, 10:24 PM IST
भारताविरुद्ध युद्धासाठी पाकिस्तानची 'न्युक्लिअर' रणनीती - चौधरी title=

कराची : पाकिस्ताननं पुन्हा एकदा भारताला आपल्या न्युक्लिअर हत्यारांची धमकी दिलीय. भारताच्या 'कोल्ड स्टार्ट डॉक्टरिन'ला सडेतोड उत्तर देण्यासाठी पाकिस्ताननं छोट्या न्युक्लिअर हत्यारांची निर्मिती केलीय, असं विधान पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाज चौथरी यांनी केलंय. 

पाकिस्तानच्या दाव्यानुसार, आपल्या शेजारी देशासोबत संभावित युद्धापरिस्थितीसाठी भारतानं 'कोल्ड-स्टार्ट डॉक्टरिन' बनवलंय. भारतानं यासाठी आपल्या सेनेच्या छोट्या - छोट्या तुकड्या बनवल्यात. या तुकड्यांमध्ये सेनेच्या वेगवेगळ्या शाखांचे तेज-तर्रार जवान सहभागी आहेत जे अत्याधुनिक हत्यांसहीत सज्ज आहेत. 

'डॉन' या वर्तमानपत्रानं दिलेल्या बातमीनुसार, ही पहिलीच वेळ आहे जेव्हा पाकिस्तानच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं न्युक्लिअर हत्यांरांच्या निर्मितीबद्दल आपल्या देशाच्या निर्णयावर भूमिका स्पष्ट केलीय. छोटे न्युक्लियर हत्यारांची निर्मिती पाकिस्तानची प्राधान्य असलेली रणनीती असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. 

पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या अमेरिका यात्रेदरम्यान पाकिस्तान वॉशिंग्टनसोबत कोणत्याही अणुकरारावर स्वाक्षरी करणार नसल्याचंही चौधरी यांनी स्पष्ट केलंय.

न्युक्लिअर हत्यारं युद्धाची सुरुवात करण्यासाठी नाही तर देशाच्या रक्षणासाठी असल्याचं त्यांनी म्हटलंय. 
  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.