जगातील निवडक भूतबंगले, या ठिकाणाहून जाणे म्हणजे?

जगातील काही अशा जागा आहेत असे म्हटले जाते की या ठिकाणी भूतांचं वास्तव्य आहेत. यातील सत्य आणि प्रामाणिकता सिद्ध करणे खूप मोठे आव्हान आहे. पण लोकांनी आपल्या अनुभवाच्या आधारावर या ठिकाणांवर भूतांचे वास्तव्य आहे किंवा आत्मा राहतात असे म्हटले आहे. या लोकांनुसार ही ठिकाणं खूप भीतीदायक आहे. या ठिकाणी झालेला मृत्यू, हत्या आणि विचित्र पद्धतीने दिलेल्या शिक्षांमुळे येथे भूतांचा वास असल्याचे म्हटले जाते. पण झी मीडिया या दाव्यांना दुजोरा देत नाही. 

Updated: Oct 20, 2015, 02:48 PM IST
जगातील निवडक भूतबंगले, या ठिकाणाहून जाणे म्हणजे? title=

मुंबई : जगातील काही अशा जागा आहेत असे म्हटले जाते की या ठिकाणी भूतांचं वास्तव्य आहेत. यातील सत्य आणि प्रामाणिकता सिद्ध करणे खूप मोठे आव्हान आहे. पण लोकांनी आपल्या अनुभवाच्या आधारावर या ठिकाणांवर भूतांचे वास्तव्य आहे किंवा आत्मा राहतात असे म्हटले आहे. या लोकांनुसार ही ठिकाणं खूप भीतीदायक आहे. या ठिकाणी झालेला मृत्यू, हत्या आणि विचित्र पद्धतीने दिलेल्या शिक्षांमुळे येथे भूतांचा वास असल्याचे म्हटले जाते. पण झी मीडिया या दाव्यांना दुजोरा देत नाही. 

पाहू या जगातील अशा काही जागा ज्या ठिकाणी भूत असल्याचा दावा केला जातो. या ठिकाणांना भेट देण्यासाठी लोक हॉन्टिंग टूर म्हणून जातात. त्या ठिकाणी लोकांच्या राहण्याचीही व्यवस्था केली जाते. 


विलिस्का मर्डर हाऊस 

लोवाच्या विलिस्कामधील हे ठिकाणी १९१२मध्ये चर्चेत आले. एका कुटुंबाची अत्यंत क्रूर आणि निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. या ठिकाणी दावा करण्यात येतो की रात्री तुम्हांला विचित्र आकृत्या आणि आत्मा दिसतात. तसेच भीतीदायक आवाजही येतात. लोकांचा दावा आहे या ठिकाणी एक रात्र घालविणे जोखमीचे काम आहे. 

...........

कॅलिफॉर्नियाचा क्वीन मॅरी 

कॅलिफोर्नियातील लॉन्ग बीच येथील क्वीन मेरीचा महल आहे. या महलला टाइम मॅगझीननेही जगातील १० निवडक हॉन्टेड जागांमध्ये सामील केले होते. या स्थानाबद्दल बोलले जाते की येथील भूत आणि आत्मा लोकांना घाबरवतात. या ठिकाणाहून रात्री जाणे खूप खतरनाक असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. म्हटले जाते की या ठिकाणी महिला आणि आत्मा दिसतात. 

...........

न्यू यॉर्क शानले हॉटेल

हे हॉटेल पाहिल्यावरच आपल्या भीती वाटते. यातील बेसमेंट आणि छुप्या खोल्या खूप भीतीदायक आहेत. या ठिकाणाबद्दल बोलले जाते की या ठिकाणी सामूहिक हत्याकांड झाले होते. त्या ठिकाणी हत्या झालेल्या व्यक्तींच्या आत्मा आजही दिसतात. 

मॅसाच्युएट्सची फाल नदी
मॅसाच्युएट्सची फाल नदी खूप भीतीदायक मानली जाते. तुम्ही या ठिकाणचे रोमांच अनुभवण्यासाठी या ठिकाणी तुम्ही रूमही बूक करू शकतात. 

केंटुकी का वेवरली हिल्स सॅनोटिरिअम

केंटुकीच्या वेवरली हिल्स सॅनोटिरिअमची निर्मिती इस. १९०० मध्ये करण्यात आले होते. म्हटले जाते की या ठिकाणी अनेक मृतदेह गाडण्यात आले होते. तेव्हापासून या ठिकाणांवर भूतांचा वावर असतो. या ठिकाणी राहण्यासाठी तुम्ही रूम बूक करू शकतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.