ओबामांनी मोदींना म्हटलं ‘मॅन ऑफ अॅक्शन’!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी पुन्हा एकदा मोदीस्तुती केलीये. मोदींना अन्य कोणत्याही जागतिक नेत्यापेक्षा जास्त उत्साहानं भेटत ओबामांनी ‘मॅन ऑफ अॅक्शन’ असे कौतुगोद्गार काढले. 

Updated: Nov 13, 2014, 06:01 PM IST
ओबामांनी मोदींना म्हटलं ‘मॅन ऑफ अॅक्शन’! title=

नाय पी ताँ: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी पुन्हा एकदा मोदीस्तुती केलीये. मोदींना अन्य कोणत्याही जागतिक नेत्यापेक्षा जास्त उत्साहानं भेटत ओबामांनी ‘मॅन ऑफ अॅक्शन’ असे कौतुगोद्गार काढले. 

हा नरेंद्र मोदींचा करिष्मा आहे... की अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष बराक ओबामांची गरज... पण ओबामांनी पुन्हा एकदा मोदी-स्तुतीचा पाढा वाचलाय. म्यानमारची राजधानी नाय पी ताँ इथं मोदींना सामोरे जात ओबामा म्हणाले.

"यू आर ए मॅन ऑफ अॅक्शन"

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता सय्यद अकबरुद्दीन यांनी ट्वीटरवर ही माहिती लिहिलीये. म्यानमारचे पंतप्रधान थीन सिन यांच्या मेजवानीवेळी ओबामा-मोदी आमनेसामने आले आणि ओबामा मोदींना मॅन ऑफ अॅक्शन म्हणाल्याचं अबरुद्दीन यांनी लिहिलंय. 

आसियान आणि पूर्व आशियाई शिखर संमेलनाच्या निमित्तानं जागतिक नेत्यांसाठी हा मेजवानीचा बेत म्यानमारच्या पंतप्रधानांनी आखला होता.

गेल्या 6 आठवड्यांत ओबामांची मोदींसोबत ही दुसरी भेट... यापूर्वी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात व्हाईट हाऊसमध्ये ओबामांनी मोदींचा पाहुणचार केला होता.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.