नवी दिल्ली : फ्रान्सच्या समुद्रकिनाऱ्यावर एका अवाढव्य व्हेल माशाचं शव इथं चिंतेचं कारण ठरतंय. कारण, तब्बल १५ टन वजन असणाऱ्या या व्हेल माशाच्या शरीरात गॅस भरत चाललाय. त्यामुळे, तो कधीही फुटू शकतो.
या माशाच्या आसपास कुणीही जाऊ नका, असा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय. यावर, उपाय शोधण्याचं काम सध्या सुरू आहे. सध्यातरी अधिकाऱ्यांनी संपूर्ण समुद्रकिनारा बंद केलाय. इथं जाण्यापासून लोकांना बंदी करण्यात आलीय. यावर उपाय म्हणून अधिकाऱ्यांनी या माशाचं शव डायनामाईटच्या साहाय्यानं ब्लास्ट करण्याचा निर्णय घेतलाय.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, गरमीमुळेर व्हेल माशाच्या शवामध्ये गॅस तयार होत राहतो... त्यामुळे त्याचं शरीर फुगत जातं... आणि ते कोणत्याही क्षणी फुटू शकतं. यामुळे, कुणाला दुखापत होण्याचीही शक्यता आहे.
व्हेल माशाच्या शरीरात गॅस भरल्यानंतर त्याचं फुटणं किती भयंकर असू शकतं... हे या गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये दिसू शकेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.