नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र परिषदेत भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानवर जोरदार हल्ला केला आहे. भारताने म्हटलं की, दहशतवादाला पांठिबा देणं शांती आणि स्थिरतेला धोका आहे. अणु बॉम्बची धमकी देणाऱ्यांविरोधात जगाने एकजूट झालं पाहिजे.
आंतरराष्ट्रीय समुदायाने अशा तत्वांविरोधात एकत्र उभं राहिलं पाहिजे ज्यांनी नियम मोडत अणुशक्ती ही धोकादायक लोकांच्या हातात दिली. पाकिस्तानने नकळत अणुबॉम्ब निर्माण केले आणि ते धोकादायक लोकांच्या हातात दिले. यूएनमध्ये पाकिस्तानला उत्तर देतांना भारताने हे प्रत्त्यूतर दिलं आहे.
उरी हल्ल्यानंतर भारतभर संतापाची लाट होती. भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानचं कंबरडं मोडलं आणि पीओकेमध्ये कशा प्रकारे पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतंय हे समोर आलं. पण पाकिस्तानने हे मान्य करण्यास नकार दिला. यानंतर भारताकडून सतत पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळा पाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पुन्हा एकदा भारताने पाकिस्तानला चोख उत्तर देत याच गोष्टीची मागणी केली आहे.