नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना घरातूनच आता आव्हान मिळत आहे. नवाज यांची मुलगी मरियम नवाज हिला पीएमएल (एन) या पक्षाची पक्षप्रमुख बनवण्याचा शरीफ यांचा विचार आहे. पण भाऊ शहबाज शरीफ यांनी याला विरोध केला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार देश आणि विदेशात पाकिस्तानला एकट पाडण्याच्या प्रयत्नानंतर नवाज शरीफ यांनी हा निर्णय घेणार असल्याचं म्हटलं जातंय. पण त्यांच्याच पक्षात आला विरोध सुरु झाला आहे.
डेली टाइम्सच्या माहितीनुसार नवाज यांची इच्छा आहे की, निवडणुकांमध्ये मुलीला जबाबदारी द्यावी. भाऊ आणि पंजाबचे मुख्यमंत्री शहाबाज शरीफ आणि इतर मोठ्या नेत्यांचा याला मात्र विरोध सुरु झाला आहे.
पक्षातील एका मोठ्या नेत्याने नवाज यांना पक्षप्रमुख पदासाठी पक्षातील लोकांमध्य़े निवडणूक घेण्याचा सल्ला देथील दिला आहे. त्यामुळे पक्षासोबतच आता घरातूनच शरीफ यांच्या निर्णयाला विरोध सुरु झाल्याने शरीफ यांच्यासमोरील आव्हान वाढत आहे.