दाऊद भारत सरकारला घाबरला, मुक्काम हलवला!

मुंबईत १९९२ साली झालेल्या बॉम्बस्फोटांचा मास्टरमाईंड आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं पाकिस्तानमधून आपला मुक्काम हलवला असून आयएसआयच्या मदतीनं तो सध्या पाक-अफगाणच्या बॉर्डरवरील अज्ञातस्थळी लपला असल्याची माहिती समोर येत आहे. 

PTI | Updated: Oct 27, 2014, 04:52 PM IST
दाऊद भारत सरकारला घाबरला, मुक्काम हलवला!    title=

इस्लामाबाद: मुंबईत १९९२ साली झालेल्या बॉम्बस्फोटांचा मास्टरमाईंड आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं पाकिस्तानमधून आपला मुक्काम हलवला असून आयएसआयच्या मदतीनं तो सध्या पाक-अफगाणच्या बॉर्डरवरील अज्ञातस्थळी लपला असल्याची माहिती समोर येत आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून दाऊद कराचीत दिसत नसून तो भूमिगत झाला आहे अशी माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिल्याचं वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलंय. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान दहशतवादा रोखण्यासंदर्भात दोन्ही देशांनी संयुक्तरित्या प्रयत्न करण्याबद्दल करार झाला होता. तसंच दाऊद इब्राहिमला पकडण्यासाठीही दोन्ही देश प्रयत्नशील आहेत. त्यामुळंच घाबरलेल्या दाऊदनं ही हालचाल केल्याचं समजतं.

डी-कंपनीच्या हालचालींवर नजर ठेऊन असणाऱ्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून दाऊद कराचीत दिसत नाहीये, तसंच आपल्या निकटवर्तीयांशीही त्यानं कोणत्याही प्रकारे संपर्क साधलेला नाही. आयएसआयच्या मतदीनं त्यानं कराचीतून पळ काढला असून पाक-अफगाण बॉर्डरवर एका सुरक्षित स्थळी तो लपला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.