'योगाला विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे'

विश्‍व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी वादग्रस्त वक्तव्य वक्तव्य केलं आहे, "योगाला विरोध करणाऱ्या देशामध्ये राहण्याचा काहीही अधिकार नसून त्यांनी पाकिस्तानात निघून जावे". 

Updated: Jun 23, 2015, 07:28 PM IST
'योगाला विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे' title=

नवी दिल्ली : विश्‍व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी वादग्रस्त वक्तव्य वक्तव्य केलं आहे, "योगाला विरोध करणाऱ्या देशामध्ये राहण्याचा काहीही अधिकार नसून त्यांनी पाकिस्तानात निघून जावे". 

योगदिनाच्या निमित्ताने राजधानी दिल्लीतील राजपथावर झालेल्या भव्य कार्यक्रमात उपराष्ट्रपती हमीद अन्सारी उपस्थित राहिले नाहीत. त्यावर ‘रविवारी साजरा करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणजे एखाद्या राजकीय नेत्याच्या मुलीचे लग्न नव्हते ज्याच्या निमंत्रणाची त्यांना गरज होती‘ अशा शब्दांत साध्वी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने योगादिनाला केलेल्या विरोधानंतर साध्वी प्राची यांनी अशाप्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.  यापूर्वीच भारतीय जनता पक्षाचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी "सूर्य नमस्कारा‘ला विरोध करणाऱ्या समुद्रात बुडून मरावे, असे वक्तव्य केले होते.

साध्वी प्राची योगाला विरोध करणा-यांना उद्देशू म्हणाल्या, ‘त्यांनी स्वत:ला भारतीय परंपरांसोबत, संस्कृतीसोबत जोडून घ्यायला हवे. त्याला विरोध करण्याचे काही कारण नाही. जर त्यांना विरोध करायचा असेल तर त्यांनी पाकिस्तानात जावे. जे लोक विरोध करतात त्यांना भारतामध्ये राहण्याचा काहीही अधिकार नाही‘.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.