विम्याच्या नावाखाली १०० कोटींचा गंडा

Updated: Jun 23, 2015, 07:23 PM IST
विम्याच्या नावाखाली १०० कोटींचा गंडा title=
भोपाल : मध्यप्रदेशमधील एका एमबीए ग्रॅजूएट मुलाच्या डोक्यात झटपट पैसा कमावण्याचं भूत संचारलं आणि त्यानं आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं लोकांना १०० कोटींचा गंडा घातला. ग्वालियर पोलिसांनी विम्याच्या नावाखाली १०० कोटींचा गंडा घालणाऱ्या २० लोकांना अटक केली असून यात ८ महिलांचा समावेश आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिलमध्ये एका रेल्वे केली की त्याला विम्याचा बोनस देण्याच्या नावाखाली 'ट्रिप टूर पॅकेज' नावाच्या कंपनीनं १७ लाखांचा गंडा घातलाय. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली ज्यात या पूर्ण टोळीचा पर्दाफाश करण्यात त्यांना यश आलंय. ज्या लोकांच्या विम्याच्या पॉलिसी बंद होत होत्या त्या लोकांना शोधून त्यांना बोनसचे आमिष दाखवले जात होतं. आतापर्यंत या टोळीने १०००० लोकांना १०० कोटींचा गंडा घातलाय. 
ही टोळी आकाश बिडलाच्या हाताखाली काम करत होती. आकाशने इंग्लंडमधून एमबीए केलं असून त्याची पत्नी उर्वशीही त्याच्यासोबत कार्यरत होती. त्यांच्यासोबत पोलिसांनी २० लोकांना अटक केली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.