राष्ट्रीय महामार्गावर दारुविक्रीस सुप्रीम कोर्टाची बंदी

सुप्रीम कोर्टाने हायवेवर दारुबंदीचे आदेश दिले आहेत. मुख्य न्यायाधीश टीएस ठाकुर यांच्या अध्यक्षतेखाली सुप्रीम कोर्टाच्या एका पीठाने देशभरात राष्ट्रीय महामार्गांवर दारुबंदी लागू करण्यास सांगितले आहे.

Updated: Dec 15, 2016, 11:50 AM IST
राष्ट्रीय महामार्गावर दारुविक्रीस सुप्रीम कोर्टाची बंदी  title=

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने हायवेवर दारुबंदीचे आदेश दिले आहेत. मुख्य न्यायाधीश टीएस ठाकुर यांच्या अध्यक्षतेखाली सुप्रीम कोर्टाच्या एका पीठाने देशभरात राष्ट्रीय महामार्गांवर दारुबंदी लागू करण्यास सांगितले आहे.

सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की, दारु विक्रेत्यांकडे जोपर्यंत आता लायसेन्स आहे तोपर्यंत ते विक्री करु शकतात पण यानंतर आता लायसन्स रिन्यूअल करता येणार नाही.