दहशतवादी हल्ल्यात एकाचा मृत्यू, ३ जखमी

जम्मू जवळ कथुआमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झालेत. सैनिकांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी बोलेरो गाडीवर गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-पाठणकोट महामार्गावर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 28, 2014, 09:02 AM IST

www.zee24taas.com, झी मीडिया, जम्मू
जम्मू जवळ कथुआमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झालेत. सैनिकांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी बोलेरो गाडीवर गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-पाठणकोट महामार्गावर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय.
हा हल्ला जंगलकोट लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. लष्कर आणि दहशतवादी यांच्यात धुमश्चक्री सुरू असून गोळीबाराचे आवाज येत आहेत. याआधी कथुआतील दयालचक भागातून चार सशस्त्र दहशतवाद्यांनी एक बोलेरो गाडी अडवून ताब्यात घेतली आणि गोळीबार करत घटनास्थळावरुन पलायन केले.
दहशतवादी हल्ल्यातील जखमींना जम्मू येथील शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दहशतवाद्यांनी जिथून बोलेरो गाडी पळवली ते ठिकाण लष्कराच्या हद्दीत येते. हे ठिकाण भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आहे. त्यामुळे या घटनेची गंभीर दखल घेत लष्कराने शोध मोहीम हाती घेण्याचे आदेश दिलेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.