नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पवारांचा मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा थेट आरोप

सध्याच्या मोदीं सरकारमध्ये कुठेतरी भ्रष्टाचार होत असावा, असा संशय राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलाय.

Updated: Dec 31, 2016, 07:18 PM IST
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पवारांचा मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा थेट आरोप title=

सोलापूर : सध्याच्या मोदीं सरकारमध्ये कुठेतरी भ्रष्टाचार होत असावा, असा संशय राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलाय.

सोलापुरातल्या माढा तालुक्यातील विरवाडे येथे शिक्षण संस्थेत भाऊराव पाटील यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. पन्नास दिवसानंतर देशातील नोटबंदीवरून तयार झालेली परिस्थती सुधारण्यात सरकारला अपयश आलंय अशीही टीका त्यांनी यावेळी केलीय.

देशात सध्या कोट्यवधी नवीन नोटा विविध छाप्यात सापडत आहेत. एकतर या नवीन नोटा आरबीआय, सिक्युरिटी प्रेस आणि बँकमधून चलनात येतात... मग या नोटा चलनात कोठून येतात याच अर्थ भ्रष्टाचाराची साखळी काम करतेय, हे स्पष्ट असल्याची थेट टीका शरद पवार यांनी केलीय.