'भ्रष्टाचार आणि काळ्या धनाविरुद्ध लढाई थांबता कामा नये'

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला उद्देशून आज पुन्हा एकदा भाषणासाठी उभे आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 31, 2016, 08:21 PM IST
'भ्रष्टाचार आणि काळ्या धनाविरुद्ध लढाई थांबता कामा नये' title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला उद्देशून आज पुन्हा एकदा भाषण केलं. 8 नोव्हेंबर रोजी केलेल्या भाषणात मोदींनी केलेल्या नोटाबंदीच्या घोषणेनंतर आज मोदी काय घोषणा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं... 

काय म्हटलंय पंतप्रधानांनी आपल्या भाषणात...

- भ्रष्टाचार आणि काळ्या धनाविरुद्ध ही लढाई थांबता कामा नये 

- मी देशाच्या तरुणांना, व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना BHIM शी जोडण्याचा आग्रह करतो

- आज सगळ्या राजनेत्यांनी राजकारणापासून वेगळं होतं एकत्र येऊन पावलं उचलण्याची गरज

- सिनिअर सिटिझनसाठी 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या रक्कमेवर 10 वर्षांसाठी वार्षिक 8 टक्क्यांनी व्याजदर निश्चित केला जाईल 

- गर्भवती महिलांच्या डिलिव्हरी, रजिस्ट्रेशन, टीकाकरणासाठी 6000 रुपयांची मदत मिळणार... पैसे अकाऊंटमध्ये ट्रान्सफर होणार

- येत्या तीन महिन्यांत 3 करोड शेतकऱ्यांच्या क्रेडिट कार्डांना RUPAY कार्डात बदललं जाईल

- डिस्ट्रीक्ट को ऑपरेटिव्ह सेंट्रल बँक आणि प्रायमरी सोसायटीतून ज्या शेतकऱ्यांनी खरीप आणि रब्बी पिकांसाठी कर्ज घेतलंय त्या कर्जाचं 60 दिवसांचं व्याज सरकार चुकवणार आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर होणार

- 12 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर व्याजात 3 टक्क्यांची सूट 

- 2017 मध्ये घर बनवण्यसाठी 9 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर व्याजात 4 टक्क्यांची सूट

- पंतप्रधान गृह योजनेंतर्गत शहरांत या वर्गासाठी नवं घर घेण्यासाठी दोन नव्या योजना

- गरीब, निम्न मध्येम वर्ग आणि मध्यम वर्गासाठी लोकांना घर खरेदी करता यावं यासाठी काही मोठी निर्णय

- देशातील सव्वाशे करोड नागरिकांसाठी सरकार काही नवीन योजना आणत आहे

- गरीब आणि मध्यम वर्गीय लोकांना ध्यानात घेत मी बँकांना पुढाकार घेऊन नवीन योजना जाहीर करण्याचं आवाहन करतो

- या लोकांना सोडलं जाणार नाही - नरेंद्र मोदी

- बेईमान लोकांनाही आता टेक्नॉलॉजीच्या ताकदीमुळे काळ्या कारभारातून निघून कायदे-नियमांचं पालन करत मुख्यधारेत यावं लागेल

- हे सरकार सज्जनांचं मित्र आहे आणि दुर्जनांसाठी सज्जनतेच्या मार्गावर परतण्यासाठी योग्य वातावरण तयार करण्याच्या बाजुनं आहे 

- आकडेवारीनुसार, सरकारकडे देशात केवळ 24 लाख लोक स्वीकार करतात की त्यांची मिळकत 10 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे 

- सत्यापासून किती काळ दूर पळणार

- हिंदुस्ताननं जे करून दाखवलंय त्याची तुलना करण्यासाठी विश्वात कोणतंही उदाहरण नाही

- विशेषकरून ग्रामीण भागांत छोट्या-छोट्या कमी दूर केल्या जाव्या

- बँक व्यवस्था सामान्य करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात यावं

- सरकार - जनता खांद्याला खांदा लावून लढत आहेत

- जनशक्तीचं सामर्थ्य सिद्ध झालं

- सव्वाशे करोड देशवासियांचा संकल्प यज्ञ

- दिवाळीनंतर देशात स्वच्छतेचा यज्ञ

- नवीन संकल्पांसह... नव्या वर्षांचं स्वागत उत्साहानं करा

- नवीन वर्षाच्या पंतप्रधानांकडून देशवासियांना शुभेच्छा

- नवीन वर्षाच्या पंतप्रधानांकडून देशवासियांना शुभेच्छा