नवी दिल्ली: काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १०० दिवसांच्या कारभारावर तोफ डागलीय. देशात महागाई वाढतेय, लोकांना वीज नाही, पाणी नाही... आणि पंतप्रधान मोदी जपानमध्ये ड्रम वाजवत बसलेत, असा भडीमार राहुल गांधींनी केलाय.
राहुल गांधी अमेठीच्या दौऱ्यावर आहेत. अमेठीतील लोकांना भेटून त्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. निवडणूक प्रचारादरम्यान मोठमोठे आश्वासनं दिले होते. मात्र ते पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नही करत नसल्याचं राहुल गांधी म्हणाले. सरकारला 100 दिवस पूर्ण झाले असून सरकारनं भ्रष्टाचार मिटविण्यासाठी काहीच केलं नाहीय. ते फक्त भाषणच देतात, असंही राहुल गांधींनी म्हटलं.
तर राहुल गांधींचं त्यांच्या पक्षात ऐकलं जात नाही, मग आम्ही कशाला ऐकायचं, असा प्रतिटोला व्यंकय्या नायडूंनी लगावलाय. तर मुख्तार अब्बास नकवी म्हणाले, काँग्रेसला खूश व्हायला पाहिजे जपानला जावून मोदींनी काँग्रेस सरकारच्या अपयशाबद्दल नाही तर विकासाबद्दल चर्चा केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.