www.24taas.com, हैदराबाद
भारतात दहशतवाद्यांची ‘घुसखोरी’ पाकिस्तानच घडवतोय याचे सज्जड पुरावे आपल्याकडे आहेत, असे काल-परवा सांगणारे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीच आता ‘झाले गेले विसरू या, पाकसंगे खेळू या’ अशी भूमिका घेतली आहे. पुढील महिन्यात भारत दौर्याकवर येणार्या, पाकिस्तानी क्रिकेट संघाचे आपण खुल्या दिलाने स्वागत केले पाहिजे, असे ते म्हणाले.
हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आयपीएस अधिकार्यांभच्या परेडला गृहमंत्री आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले की, खेळाला राजकारणापासून अलिप्त ठेवले पाहिजे. कुठल्याही देशातून खेळाडू भारतात येऊ शकतात आणि खेळू शकतात. त्यांना रोखता कामा नये. खिलाडूवृत्ती दाखवण्याची गरज आहे.
पाकिस्तानी क्रिकेट शौकिनांना एकाच शहराचा व्हीसा
२५ डिसेंबरपासून सुरू होणार्याि भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेसाठी भारतात लढतींचा आनंद लुटण्यासाठी येणार्या पाकिस्तानी क्रिकेट शौकिनांसाठी ५ हजार सिंगल सिटी व्हीसा (एकाच शहराला भेट देण्याची परवानगी) जारी केले जाणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाने केली आहे.
सलमान खुर्शिद यांच्याही पायघड्या
पाकिस्तानने मुंबई हल्ल्यातील आरोपींना शिक्षा केलीच पाहिजे, ही मागणी कायम आहे. पण संबंध सुधारण्याच्या दृष्टीने क्रिकेट सामने हे एक पाऊल असल्याचे सांगून कायदामंत्री सलमान खुर्शिद यांनीही पाक क्रिकेट संघाला पायघड्या घातल्या.