कानपूर : कानपूर शहरात ‘प्रभू रामाच्या बनावट भक्तांपासून सावध रहा‘, अशी पोस्टर्स शिवसेनेने लावले आहेत, यात भाजप नेत्यांना प्रभू रामाचे बनावट भक्त म्हणण्यात आलंय.
शिवसेनेने राम मंदिराच्या मुद्द्यावरून, उत्तर प्रदेशातील विविध शहरात पोस्टर्स लावून भाजपवर कुरघोडी केली आहे.
उत्तर प्रदेशातील शिवसेनेचे सरचिटणीस मनोज तिवारी म्हणाले, 'सत्तेत नव्हते तेव्हा भाजपचे नेते प्रभू रामाचे नाव घेत होते. पण, सत्तेत आल्यानंतर भाजप नेते प्रभू राम आणि राम मंदिर हे सर्व विसरून गेले आहेत.
कानपूरमधील किडवाईनगरमध्ये झालेल्या सभेत शिवसेना नेते अनिल सिंह यांनी भाजपला इशारा देत, ‘हम जो कहते है, वही करते है, नकली रामभक्तोंसे सावधान‘ असे म्हटले आहे. राम मंदिर बनविण्यासाठी उत्तर प्रदेशातील नागरिकांनी शिवसेनेला संधी द्यायला हवी, असंही आवाहन करण्यात आलंय.
आम्ही जेव्हा मंदिराबाबत त्यांच्याशी विचारायला गेलो. त्यावेळी त्यांनी फक्त विकास आणि नागरि प्रश्नांशी संबंधित चर्चा केली. त्यामुळे आम्ही आता या होर्डिंगच्या माध्यमातून भाजप नेते हे प्रभू रामाचे बनावट भक्त असल्याचे सांगत आहोत.'
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.