नवी दिल्ली : देशातील तब्बल ६०० सरकारी योजनांना भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, पंतप्रधान राजीव गांधी यांची नावे देण्यात आलीत. स्कॉलरशिप, संग्रहालये आणि एअरपोर्ट वगळता नेहरु-गांधी कुटुंबांच्या नावावर पाहा काय काय आहे ते
राज्य सरकारच्या ५२ योजनांना नावे. त्यापैकी राजीव गांधीच्या नावे २५ आणि इंदिरा गांधींच्या नावे २७ योजना आहेत.
२९ खेळांच्या स्पर्धा आणि चषकांना या नेत्यांची नावे देण्यात आलीत. २३ राजीव गांधी, ४ इंदिरा गांधी आणि २ जवाहरलाल नेहरु नावाने स्पर्धा आणि चषक देण्यात येतात.
९८ शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांना नावे देण्यात आलीत. ५५ शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांना राजीव गांधी, २१ शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांना इंदिरा गांधी आणि २२ शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांना जवाहरलाल नेहरुंचे नाव देण्याच आलेय.
७४ रस्ते, विभाग, इमारत्यांना या नेत्यांची नावे देण्यात आलीत. या नेत्यांच्या नावाने ५१ पुरस्कार दिले जातात. ३९ चिकिस्ताप्रमुखालय आणि रुग्णालयांनाही यांची नावे आहेत.
नेहरु-गांधी कुटुबांच्या नावाने १५ विविध स्कॉलरशिप, १५ नॅशनल पार्क, संग्रहालय, ५ एअरपोर्ट अथवा बंदरे आहेत.
६०० सरकारी योजनांना जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची नावे देण्यात आलीत.