नवी दिल्ली : दिल्लीत तीन वर्षांपूर्वी झालेल्या निर्भया प्रकरणातला अल्पवयीन दोषी रविवारी मोकाट सुटणार असल्याचं स्पष्ट झालंय.
दिल्ली हायकोर्टानं या गुन्हेगाराच्या मुक्ततेला स्थगिती देण्यास नकार दिलाय. २० तारखेला या दोषीची शिक्षा संपतेय. हा गुन्हेगार आता २१ वर्षांचा झालाय. त्याला मोकळा सोडणं धोकादायक आहे.
त्यामुळे त्याची मुक्तता अडवण्यासाठी कोर्टानं हस्तक्षेप करावा, अशी मागणी स्वामी यांनी आपल्या याचिकेत केली होती. सुटकेला स्थगिती देण्यास नकार दिला असला तरी हायकोर्टानं स्वामी यांनी याचिकेत मांडलेले मुद्दे ग्राह्य धरलेत. त्याला अनुसरून दिल्ली आणि केंद्र सरकारला नोटीस बजावण्यात आलीये.