नवी दिल्ली : एका महिलेनं मोबाईल अॅपच्या साहाय्यानं कॅब सर्व्हिस 'टॅक्सीफॉरशुअर'ला संपर्क केला. यावेळी कॅबच्या ड्रायव्हरनं दिल्लीच्या साकेतहून फरीदाबादला जाताना अश्लील गोष्टी केल्याचा आरोप महिलेनं केलाय.
उल्लेखनीय म्हणजे, या महिलेनं ही गोष्ट सोशल वेबसाईट फेसबुकवर शेअर केलीय. मात्र तिनं पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही. शिवाय महिलेनं ड्रायव्हर देवेंद्र कुमार याच्यावर कारवाईची मागणी करत त्याला तुरुंगात धाडण्याची केलीय.
टॅक्सीसाठी आपण ओलाकॅबला फोन केला आणि 'टॅक्सी फॉर शुअर'ची कॅब तिला घेण्यासाठी दाखल झाली. आपण फोनवर बोलत असताना ड्रायव्हरनं पहिल्यांदा तर मोठ्या आवाजात संगीत सुरू केलं. त्यानंतर जेव्हा माझं इच्छित स्थळ 25 मिनिटांच्या अंतरावर होतं तेव्हा ड्रायव्हर बेचैन झाला आणि जागेवरच हलू लागला, असं महिलेनं आपल्या फेसबुक पोस्टवर म्हटलंय.
त्यानंतर ड्रायव्हरला आपण गाडी व्यवस्थित चालवण्यास सांगितलं तेव्हा मी पाहिलं की तो गाडी चालवताना हस्तमैथुन करत होता, असंही महिलेनं म्हटलंय. इच्छित स्थळी उतरल्यानंतर याबद्दल आपण ड्रायव्हरशी प्रश्न केले तेव्हा त्यानं सगळ्या गोष्टींना नकार देत उलट उत्तरं दिली, असं महिलेनं म्हटलंय.
याबद्दल पोलिसांशी संबंध साधला असता त्यांनी याबदद्ल आपल्याकडे कोणतीही तक्रार दाखल झाली नसून औपचारिकरित्या तक्रार मिळाल्यानंतरच आपण यावर कारवाई करू असं म्हटलंय.
दरम्यान, टॅक्सी फॉर शुअरच्या प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, ही घटना खेदजनक आहे. आम्ही ड्रायव्हरला हटवलंय तसंच आमच्या कंपनीत त्याला ब्लॅकलिस्ट करण्यात आलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.