बुलंदशहर/मेरठ : बुलंद शहराच्या उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकारी बी. चंद्रकला या एका व्हिडीओनंतर चर्चेत आल्या आहेत.
हा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होतोय, बुधवारी नगरपालिकेच्या विकास कामात भ्रष्टाचार आणि कमीशनखोरीची चौकशी बी चंद्रकला करत होत्या.
या दरम्यान कामाचा दर्जा निकृष्ट आढळून आल्याने बी चंद्रकला यांनी उपस्थित अधिकारी आणि नगरपालिका चेअरमनला झापलं.
डीएम बी चंद्रकला यांचं सर्वबाजूने कौतुक केलं जात आहे. स्थानिक लोकांच्या मते बी चंद्रकला यांनी भ्रष्टाचाराविरोधात मोर्चा उघडला आहे. बुलंद शहरात पेव्हर ब्लॉकसाठी वापरण्यात येणारे पेव्हर ब्लॉक हे निकृष्ट आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.