डिझेल ४५ पैशांनी महागले, पेट्रोल २५ पैशांनी स्वस्त

सरकारनं डिझेलवरील नियंत्रण हटवल्यानंतर त्याचे लगेचच परिणाम जाणवू लागले आहेत. डिझेल ४५ पैशांनी महागले आहे.

Updated: Jan 18, 2013, 09:47 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
सरकारनं डिझेलवरील नियंत्रण हटवल्यानंतर त्याचे लगेचच परिणाम जाणवू लागले आहेत. डिझेल ४५ पैशांनी महागले आहे. मध्यरात्रीपासून नवीन दर लागू झाले आहेत. विशेष म्हणजे दर महिन्याला डिझेलचे दर वाढणार आहेत. त्यामुळं २०१३ मध्ये महागाईचा आगडोंब उसळणार असून सामान्यांना याची मोठी झळ बसणार आहे.
तर विनाअनुदानित गॅस सिलिंडरही महागला आहे. विनाअनुदानित गॅस सिलिंडर ४६.५० रुपयांनी महागला आहे. दुसरीकडे पेट्रोलचे दर २५ पैशांनी स्वस्त करून तेल कंपन्यांनी ग्राहकांना अल्पसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
सध्या स्वयंपाकाचे सिलिंडर ४६३ रुपयांस मिळत होते. सातव्या सिलिंडरसाठी ४९० रुपये जादा द्यावे लागत होते. आता वर्षात आणखी तीन अनुदानित सिलिंडर मिळणार आहे. काँग्रेसशासित अनेक राज्यांनी पूर्वीच ९ सिलिंडरचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे इतर पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांतील लोकांना दिलासा मिळाला आहे. डिझेलच्या दरवाढीमुळे प्रत्येक वस्तू महाग होण्याची शक्यता आहे.