मध्यरात्री ही कामे कधीही करु नका

हल्ली व्यस्त जीवनशैलीमुळे पुरेशा प्रमाणात झोप मिळत नाही. चांगली झोप न मिळाल्यास व्यक्ती चिडचिड्या होतात. त्यांच्यात उर्जेचीही कमतरता जाणवते. अनेकदा रात्रीच्या सवयी निद्रानाशाला कारणीभूत ठरतात. जर तुम्हालाही मध्यरात्री अशा सवयी आहेत तर आताच सावधान. रात्रीची झोप ही निरोगी आरोग्यासाठी जीवनाश्यक आहे. त्यामुळे मध्यरात्रीच्या या सवयी लवकरात लवकर बदला

Updated: Dec 31, 2015, 02:53 PM IST
मध्यरात्री ही कामे कधीही करु नका title=

नवी दिल्ली : हल्ली व्यस्त जीवनशैलीमुळे पुरेशा प्रमाणात झोप मिळत नाही. चांगली झोप न मिळाल्यास व्यक्ती चिडचिड्या होतात. त्यांच्यात उर्जेचीही कमतरता जाणवते. अनेकदा रात्रीच्या सवयी निद्रानाशाला कारणीभूत ठरतात. जर तुम्हालाही मध्यरात्री अशा सवयी आहेत तर आताच सावधान. रात्रीची झोप ही निरोगी आरोग्यासाठी जीवनाश्यक आहे. त्यामुळे मध्यरात्रीच्या या सवयी लवकरात लवकर बदला

१. निकोटीनचा झोपेवर मोठा परिणाम होतो. निकोटीनमुळे तुम्ही अनेक तास जागे राहू शकता. यामुळे तुमच्या मेंदूला आणि शरीराला आराम मिळत नाही. मध्यरात्री सिगारेट पिण्याच्या सवयीमुळे तुमच्या झोपेच्या प्रक्रियेवर मोठा परिणाम होतो. 
२. जर तुम्ही मध्यरात्री दारु पित आहात तर तुमच्यासाठी शरीरासाठी अजिबात चांगले नाही. 
३. रात्रीच्या वेळेस अथवा मध्यरात्री कॅफेनचे सेवन हानिकारक असते. जर तर तुम्ही अर्ध्यारात्री कॅफीनचे सेवन करत आहात तर तुम्ही पुढील काही तासांसाठी तुमची झोप ढकलताय. 
४. रात्रीच्या वेळेस कधीही गोड पदार्थ खाऊ नका. यामुळे शरीरात कॅलरीजचे प्रमाण वाढते. अशामध्ये वजन वाढण्याची शक्यता अधिक वाढते. 
५. रात्री उशिरा अथवा मध्यरात्रीच्या वेळेस अधिक मसालेदार पदार्थ खाणे टाळा. यामुळे पोटात गॅससारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. 
६. रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहणे हे स्वास्थासाठी हानिकारक आहे. रात्रीच्या वेळेस टीव्ही पाहण्याने डोळ्यावर ताण येतो. त्याचबरोबर मेंदूला आवश्यक आरामही मिळत नाही. 
७. रात्री उशिरापर्यंत जागून काम करण्याने तसेच ऑफिसची कामे घरी आल्यावर जागून करणे यामुळे तुमच्या झोपेवर परिणाम होतो. साहजिकच अपुऱ्या झोपेचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो.