महिन्याच्या 'त्या' दिवसांत गाजर खाणे फायदेशीर

अनेक महिलांना महिन्यांच्या त्या चार ते पाच दिवसांत खूप त्रास होतो. पोटात दुखणे, पाठ,कंबरदुखीचा त्रास, अनियमित स्त्राव अशा अनेक समस्या महिलांना जाणवतात. त्या दिवसांमध्ये या त्रासापासून दूर राहायचे असल्यास गाजराचे सेवन करणे फायदेशीर ठरते. 

Updated: Dec 31, 2015, 11:33 AM IST
महिन्याच्या 'त्या' दिवसांत गाजर खाणे फायदेशीर title=

मुंबई : अनेक महिलांना महिन्यांच्या त्या चार ते पाच दिवसांत खूप त्रास होतो. पोटात दुखणे, पाठ,कंबरदुखीचा त्रास, अनियमित स्त्राव अशा अनेक समस्या महिलांना जाणवतात. त्या दिवसांमध्ये या त्रासापासून दूर राहायचे असल्यास गाजराचे सेवन करणे फायदेशीर ठरते. 

पाळीच्या दिवसांत महिलांनी गाजराचा रस प्यायल्यास अतिशय उपयोगी ठरतो. गाजराचा रस अथवा गाजर खाल्ल्यास रक्तस्त्राव नियमित होतो. तसेच त्यावेळी होणारा त्रास कमी होतो. चिडचिडेपणाही कमी होतो.

गाजरात लोहचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पाळीच्या दिवसात लोहाची शरीरातील मात्रा कमी होऊ नये यासाठी गाजर खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच या दिवसांत बीटा कॅरोटिनचे प्रमाण अधिक असलेल्या पदार्थांचे सेवन करणेही फायदेशीर ठरते. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्यास ते नियंत्रित करण्यास बीटा कॅरोटिनयुक्त पदार्थ उपयुक्त ठरतात. पाळीदरम्यान त्रास होत असल्यास दिवसांत एक ते दोन ग्लास गाजराचा ज्यूस पिणे फायदेशीर ठरते.