टेस्टोस्टेरोन वाढवण्यासाठी सहा नैसर्गिक आणि सोप्या टीप्स

टेस्टोस्टेरोन हा शब्द तुम्ही एव्हाना ऐकला असेल... लैंगिक क्षमता वाढविण्याचं आपल्या शरीरात आढळणारं हे संप्रेरक...  

Updated: Jan 27, 2016, 02:46 PM IST
टेस्टोस्टेरोन वाढवण्यासाठी सहा नैसर्गिक आणि सोप्या टीप्स title=

मुंबई : टेस्टोस्टेरोन हा शब्द तुम्ही एव्हाना ऐकला असेल... लैंगिक क्षमता वाढविण्याचं आपल्या शरीरात आढळणारं हे संप्रेरक... केवळ पुरुषांना टेस्टोस्टेरोन वाढवण्याची गरज असते असा तुमचा समज असेल तर तुम्ही चूक आहात... महिलांनादेखील काही सोप्या आणि नैसर्गिक गोष्टी करून शरीरातील टेस्टोस्टेरोन वाढवता येतील... याच गोष्टींचा वापर तुम्हाला तुमच्या शरीरातील फॅटस् लवकरात लवकर घटविण्यासाठीही होतो. 

१. आपल्या आहारातून साखर आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ हद्दपार करा. जेवढं जमेल तेवढं जास्तीत जास्त कच्च्या भाज्या आणि फळांचा समावेश तुमच्या आहारात करा. 

२. फॅटस् नेहमीच तुमच्या शरीराला हानीकारक ठरतात असा तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे. कारण हेल्दी फॅटस् म्हणजे, मासे, ऑलिव्ह ऑईल, शेंगदाण्याचं तेल यांतून तुम्हाला हेल्दी फॅटस् मिळू शकतील. या पदार्थांचा समावेश तुमच्या आहारात राहील याची काळजी घ्या.

३. अल्कोहोलचं प्रमाण कमी करा. वारंवार वाईन किंवा कॉकटेल घेण्याची तुमची सवय असेल तर ती लगेचच कमी करा. आपल्या शरीरातील हार्मोन्समध्ये बदल घडवून आणण्याची क्षमता यांमध्ये असते. 

४. झोपेबाबतीत निष्काळजीपणा नको. योग्य आणि पुरेशा झोपेमुळेही तुमचे फॅटस् घटतात. दिवसातून सात तासांची शांत झोप पुरेशी आहे.

५. तुमच्या आहारातून शरीराला पुरेशी जीवनसत्त्वं आणि खनिजं जीवनसत्त्वे आणि खनिजं (विटॅमिन आणि मिनरन्स) मिळतायत ना याकडे जरूर लक्ष द्या.  झिंक, मॅग्नेशिअम, विटॅमिन डी, बी ६ या पदार्थांचा वापर करा

६. तुमच्या शरीराला मजबूत बनवण्यासाठी तुमची हाडं आणि स्नायू मजबूत असणं आवश्यक आहे. यासाठी थोडा फार व्यायाम करणं, जमेल तशा जड वस्तू उचलणं या गोष्टी तुम्ही घरच्या घरीही करू शकता.