किस करण्याचे पाच आरोग्यदायी फायदे

मुंबई : किस किंवा ज्याला मराठीत चुंबन म्हणतात हे प्रेमाची भाषा म्हणून जगातील संपूर्ण मानवजात वापरत आली आहे.

Updated: Jan 27, 2016, 11:08 AM IST
 किस करण्याचे पाच आरोग्यदायी फायदे title=

मुंबई : किस किंवा ज्याला मराठीत चुंबन म्हणतात हे प्रेमाची भाषा म्हणून जगातील संपूर्ण मानवजात वापरत आली आहे. एखाद्या व्यक्तीविषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्दांच्या वापरापेक्षा आपल्या पार्टनरला हलकासा किस करणं जास्त रोमॅन्टिक असतं. 

पण, या किसचा एव्हाढाच फायदा नाही बर का... किस करण्याचे अनेक आरोग्यविषयक फायदेही आहेत. आज आपण यातील काही फायदे जाणून घेण्याचा प्रयत्न करू...

१. दात चमकदार राहतात
किस करताना जी लाळ तयार होते ती दात किडण्यापासून दातांचे संरक्षण करते. दातांवरील अन्नाचे कण आणि काही जंतुंचा नायनाट करण्यास मदत होते. यामुळे दात किडत नाहीत आणि ते लाळेमुळे धुतले गेल्याने चमकदार राहतात.

२. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते 
सिटोमेगॅलोव्हायरस नावाचा विषाणू हा महिलांसाठी गर्भावस्थेच्या काळात धोकादायक ठरू शकतो. किसिंग या विषाणूविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकते.

३. कॅलरीज कमी करणं
किस केल्याने एका मिनिटात २-३ कॅलरीज बर्न होतात. म्हणून जर तुम्हाला वजन घटवायचे असेल तर हा उपाय लाभदायक ठरू शकतो.

४. ताण कमी करणं
तुम्हाला जर तुमच्या कामाचा रोज ताण होत असेल तर एक किस त्यावर चांगला फायदा करू शकते. किस केल्यावर शरीरात सकारात्मक भावना निर्माण होतात. एक किस तुम्हाला दिवसभरातील अनेक दुःख विसरायला मदत करू शकते.

५. चेहऱ्यावरील त्वचा नितळ ठेवते 
किस करताना चेहऱ्यावरील काही पेशी ओढल्या जातात. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या कमी पडतात आणि त्वचा नितळ राहते