मनुका खाण्याचे भरपूर फायदे

सुका मेव्यामध्ये मनुक्याचा वापर प्रामुख्याने केला जातो. अनेकांना मनुका खाणे आवडत नाही. मात्र आकाराने लहान असणाऱ्या या मनुका खाण्याने शरीराला अनेक फायदे होतात. सुके मनुके खाण्यापेक्षा भिजवलेले मनुके खाल्ल्याने फायदे होतात. भिजवलेल्या मनुक्यांमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम तसेच फायबरचे प्रमाण भरपूर असते. 

Updated: May 13, 2017, 06:24 PM IST
मनुका खाण्याचे भरपूर फायदे title=

मुंबई : सुका मेव्यामध्ये मनुक्याचा वापर प्रामुख्याने केला जातो. अनेकांना मनुका खाणे आवडत नाही. मात्र आकाराने लहान असणाऱ्या या मनुका खाण्याने शरीराला अनेक फायदे होतात. सुके मनुके खाण्यापेक्षा भिजवलेले मनुके खाल्ल्याने फायदे होतात. भिजवलेल्या मनुक्यांमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम तसेच फायबरचे प्रमाण भरपूर असते. 

जाणून घ्या याचे फायदे

अॅनिमियासारख्या आजारावर मनुका गुणकारी आहे. यात मोठ्या प्रमाणात लोह असते. तसेच व्हिटामिन बी कॉप्लेक्सही असते. 

मनुक्याच्या सेवनाने हायपरटेन्शनसारख्या समस्या दूर होतात. यातील पोटॅशियम हायपरटेन्शनची स्थिती सुधारण्यास मदत करते. 

ज्यांना वजन वाढवायचे असेल्यास त्यांनी रोजच्या डाएटमध्ये मनुक्याचा समावेश करावा. यामुळे वजन वाढण्यास मदत होते. तसेच एनर्जी वाढवण्याचे कामही मनुका करते. 

पाचनशक्ती सुधारण्यासाठी दररोज मनुका खाव्यात. मनुका खाल्ल्याने रोगप्रतिकारक क्षमताही वाढते.