कोड्यांवरील समस्येसाठी हे सहा उपाय

Updated: Dec 21, 2015, 02:58 PM IST
कोड्यांवरील समस्येसाठी हे सहा उपाय title=

नवी दिल्ली -  थंडीमध्ये केसात कोंडा होण्याचे प्रमाण वाढते. केसांची त्वचा कोरडी झाल्याने कोंड्याची समस्या उद्भवते. यामुळे केस कोरडे होणे, गळणे या समस्या सुरु होतात. यावर घरगुती उपचारांनी तुम्ही ही कोंड्याची समस्या घालवू शकता. 

लिंबाचा रस - लिंबाच्या रसात व्हिटॅमिन सी, ए, बी, फॉस्फरस आणि अँटी ऑक्सिंडटस असतात ज्यामुळे केस चमकदार आणि घनदाट होतात. जर कोड्यांची समस्या असेल गरम तेलात लिंबूचा रस टाकून केसांना मालीश करा यामुळे फायदा होईल. 

मेथी - मेथीमध्ये निकोटॅनिक अॅसिड आणि प्रोटीन असते. दोन चमचे मेथी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा त्यानंतर बारीक वाटून याचा लेप केसांना लावा. ३० मिनिटे राहु द्या. त्यानंतर सौम्य शाम्पूने केस धुवा. कोंड्याची समस्या कमी होईल.

आवळा - स्वस्थ केसांसाठी कॅरोटीनची गरज असते. केसांच्या पोषणासाठी तुम्ही आवळा तेलाचा वापर करु शकता. अथवा तुळ आणि आवळ्याच्या पावडरचा लेप केसांना लावा. कोंड्यावर हा प्रभावी उपाय आहे.

दही आणि काळी मिरी - केसात कोंडा झाल्यास दह्यामध्ये काळी मिरी वाटून त्याचे मिश्रण लावा. आठवड्यातून दोनवेळा हा प्रयोग करा. यामुळे केसातील कोंडा नष्ट होईलच त्यासोबत केस काळे, घनदाट होतील. 

तेल मालिश - केसांना चांगले पोषण मिळावे यासाठी आठवड्यातून एकदा तरी तेल मालिश करावे. यामुळे केसांच्या मुळांपाशी रक्ताभिसरण सुधारते. 

केंसाची स्वच्छता - कोंड्यासाठी महत्त्वाचे म्हणजे केसांची स्वच्छता. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हर्बल शाम्पूने केस स्वच्छ करणे गरजेचे आहे.