सावधान! या तीन पद्धतीने सेक्स केल्यास तुम्ही व्हाल HIV पीडित!

 कामजीवनात काही खबरदारी घेणे गरजेच्या आहेत. साधारणपणे सर्वप्रकारच्या जागरूकता असतानाही समाजातील मोठा वर्ग काही जरूरी माहितींपासून अनभिज्ञ असतो. यौन संबंधावेळी हे अनेक लोक जाणून किंवा अजाणतेपणे या आजारांचे शिकार होतात. ते आजार जीवघेणे आहेत. 

Updated: Dec 21, 2015, 03:08 PM IST
 सावधान! या तीन पद्धतीने सेक्स केल्यास तुम्ही व्हाल HIV पीडित! title=

नवी दिल्ली :  कामजीवनात काही खबरदारी घेणे गरजेच्या आहेत. साधारणपणे सर्वप्रकारच्या जागरूकता असतानाही समाजातील मोठा वर्ग काही जरूरी माहितींपासून अनभिज्ञ असतो. यौन संबंधावेळी हे अनेक लोक जाणून किंवा अजाणतेपणे या आजारांचे शिकार होतात. ते आजार जीवघेणे आहेत. 

एचआयव्ही / एड़्स (HIV/ AIDS)

ह्यूमन इम्यूनोडिफिशिएंसी वायरस या एचआईवी (human immunodeficiency virus or HIV) हा असा संक्रामक व्हायरस आहे. जो तीन दशकात २५ दशलक्ष लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे. या वेळी जगात ३३.४ दशलक्ष व्यक्ती एचआयव्ही संक्रमणाने म्हणजे एड्स ग्रस्त आहेत. एचआयव्ही इतर व्हायरस आणि बॅक्टरियांची लढून त्यांना मारण्यासाठी रक्तात आवश्यक असणाऱ्या टी-सेल्स (T-cell) किंवा सीडी4 सेल्स (CD4-cells)ला नष्ट करतो. यासाठी यौन संबंध ठेवताना काही गोष्टी गरजेच्या आहेत. त्यामुळे तुम्ही या व्हायरसच्या संपर्कात येऊ नये यासाठी खबरदारी राखा. 

१) असुरक्षित यौन संबंध 

असुरक्षित यौन संबधाबाबत अनेक लोक जागरूक नसतात. यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. असुरक्षित यौन संबंधाबाबत लोकांमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी असतात. असुरक्षित यौन संबंधबाबत जाणून घेणे म्हणजे यौन संचारित कोणते रोग होतात, संक्रमण कशामुळे होऊ शकते. इत्यादी बाबत जागरूकता असणे. असुरक्षित यौन संबंध म्हणजे सेक्स करताना सावधानता न बाळगणे आणि त्या संबंधात असलेल्या आजारांबाबत संपर्कात येणे. या सावधानतेमध्ये जरूरी आहे की सेक्स जोर-जबरदस्तीने करू नये. असुरक्षित यौन संबंधात यौन संचारित रोगांमुळे धोका वाढण्याची शक्यता आहे. 

पुरूष आणि महिलांमध्ये कोणत्याही प्रकारचे यौन संबंधी इन्फेक्शन असतात. त्यामुळे संक्रमण वाढण्याचा धोका असतो. 

२) एकापेक्षा अधिक पार्टनरसोबत सेक्स 

एकापेक्षा अधिक साथीदारांसोबत सेक्स म्हणजे त्या महिला असो वा पुरूष असे केल्यास संक्रमणाचा धोका अधिक असतो. एकापेक्षा अधिक पार्टनरशी यौन संबंध ठेवल्याने एचआयव्ही संक्रमणाचा धोका दुप्पटीने वाढतो. पुरूषाने एकापेक्षा अधिक महिलासोबत सेक्स केला किंवा एका महिलेने अनेक पुरूषांसोबत सेक्स केला तरी या सर्वांमध्ये एड्स होण्याचा धोका अधिक असतो. 

३) यौन संबंधांमुळे पसरणारे आजार 

यौन संबंधांमुळे पसरणारे कोणताही रोग याला एसटीडी म्हटले जातात. एसटीडी रोग खूप सामान्य आहेत. याचा प्रसार त्वरीत होतो. हे लवकर लक्षात आले तर ठीक आहे. एसटीडीचे लक्षण पुढील प्रमाणे. महिलामध्ये योनीच्या आसपास खास येणे किंवा योनीतून स्राव होणे. यौन संबंधावेळी किंवा मूत्र त्याग करतांना दुखणे, जननेंद्रीयाजवळ लाल जखम यांचा समावेश एसटीडीमध्ये होतो.