रोज २ ग्लास पाणी प्या आणि वजन घटवा

आपल्या शरीरात ७० टक्के पाणी असते. पाण्याशिवाय सजीवप्राणी जगू शकत नाही. मात्र पाणीही योग्य प्रमाणात प्यायल्याने त्याचे शरीराला अनेक लाभ होतात. जसेच कोमट पाणी शरीरासाठी अधिक लाभदायक ठरते. दोन-चार किलो वजन कमी कऱण्यासाठी केवळ डाएट गरजेचे नाही तर त्यासाठी विशेष प्रयत्नही करावे लागतात. वजन कमी करण्याचा सरळ आणि सोपा मार्ग म्हणजे दोन ग्लास पाणी. 

Updated: Mar 27, 2016, 09:06 AM IST
रोज २ ग्लास पाणी प्या आणि वजन घटवा title=

मुंबई : आपल्या शरीरात ७० टक्के पाणी असते. पाण्याशिवाय सजीवप्राणी जगू शकत नाही. मात्र पाणीही योग्य प्रमाणात प्यायल्याने त्याचे शरीराला अनेक लाभ होतात. जसेच कोमट पाणी शरीरासाठी अधिक लाभदायक ठरते. दोन-चार किलो वजन कमी कऱण्यासाठी केवळ डाएट गरजेचे नाही तर त्यासाठी विशेष प्रयत्नही करावे लागतात. वजन कमी करण्याचा सरळ आणि सोपा मार्ग म्हणजे दोन ग्लास पाणी. 

घ्या जाणून दोन ग्लास पाण्याने कसे करता येईल वजन कमी होते. जेवणाआधी पाणी प्यायल्याने भूक कमी लागते आणि खाण्यातून कमी कॅलरीज शरीरात जातात. 

जर तु्म्ही कमीत कमी तीन वेळा खाण्याआधी दोन ग्लास पाणी प्यायल्यास तर तुमचे वजन नक्कीच कमी होईल. 

साधारणपणे दरदिवशी जेवणाआधी अर्धा तास कमीत कमी दोन ग्लास पाणी प्यायल्यास तुम्ही अडीच किलोपर्यंत वजन घटवू शकता. 

तसेच जेवणात कमी कॅलरीजच्या पदार्थांचा समावेश त्याचबरोबर कमी गोडाचे पदार्थ खाण्यासोबतच पाणी अधिक प्यायल्यास वजन कमी कऱण्यास मदत होते. 

कोमट पाणी शरीरासाठी अधिक लाभदायक मानले जाते. त्यामुळे वजन कमी करायचे असल्यास कोमट पाणी अधिक प्यावे.