केसांना रोज तेल लावण्याचे फायदे

केसांना रोज तेल लावल्यामुळे केस आणखी मजबूत होतात, तसंच केस पांढरेही होत नाहीत. 

Updated: Mar 26, 2016, 06:19 PM IST
केसांना रोज तेल लावण्याचे फायदे title=

मुंबई: केसांना रोज तेल लावल्यामुळे केस आणखी मजबूत होतात, तसंच केस पांढरेही होत नाहीत. पण केसांना तेल असल्यामुळे डोक्यावर धूळ चिकटते, तसंच डोकं नीट न धुतल्यामुळे केस गळायलाही सुरुवात होते. त्यामुळे रोज केस धुणं आवश्यक आहे. 

तेल लावल्यानंतर केस गरम पाण्यानं धुवा, यामुळे केसांवरचं तेल पूर्णपणे निघून जाईल. रोज तेल लावण्याच्या काही फायद्यांवर नजर टाकूयात. 

केस कडक होत नाहीत

तुमचे केस कडक होत असतील, तर रोज तेल लावत जा. याचा फायदा तुमच्या केसांना नक्कीच होईल. 

केस होतात मुलायम आणि चमकदार

तेलानं मसाज केल्यामुळे केस मुलायम आणि चमकदार होतात, तसंच डोक्यामध्ये रक्त पोहोचायलाही मदत होते. 

केस होत नाहीत पांढरे

नियमित तेल लावल्यामुळे केस पांढरे होत नाहीत. रोज रात्री 10 मिनीटं डोक्याला तेल लावून मसाज केल्यामुळे केस मजबूत होतात. 

केसांना मिळतं प्रोटीन

तेल लावल्यामुळे केसांना प्रोटीन मिळतं, ज्यामुळे केस मजबूत व्हायला मदत होते. बदाम तेल, आवळ्याचं तेल लावल्यामुळे केस चांगले होतात. 

केस होतात लांब

ज्या मुलींना लांब केस ठेवण्याची इच्छा आहे, त्यांनी नियमित केसांना तेल लावा, यामुळे केस लांब आणि मजबूत होतात.