वरूण गांधींचा मार्ग चुकलाय - प्रियंका गांधी

प्रियंका वढेरा- गांधी अखेर वरूण गांधी यांच्याविषयी बोलल्या आहेत. आपला भाऊ वरूण गांधी याने राजकारणात चुकीचा मार्ग निवडला आहे, जनताच वरूणला योग्य रस्त्यावर आणेल, असं प्रियंका गांधी यांनी म्हटलंय.

Updated: Apr 13, 2014, 06:48 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
प्रियंका वढेरा- गांधी अखेर वरूण गांधी यांच्याविषयी बोलल्या आहेत. आपला भाऊ वरूण गांधी याने राजकारणात चुकीचा मार्ग निवडला आहे, जनताच वरूणला योग्य रस्त्यावर आणेल, असं प्रियंका गांधी यांनी म्हटलंय.
तसेच देशाची सेवा करणे म्हणजे मार्ग भरकटणे असेल, तर आता जनताच ठरवेल की कोण रस्ता भरकलंय, असे प्रत्युत्तर वरुण गांधींच्या आई मनेका गांधी यांनी दिलंय.
उत्तरप्रदेशमधील सुलतानपूर येथून निवडणूक लढवणा-या वरुण गांधींच्या विरोधात निवडणूक लढवणा-या काँग्रेसच्या उमेदवार अमिता सिंह यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत प्रियंका गांधींनी प्रथमच वरुण गांधींवर टीका केली.
वरुण गांधी हा चुकीच्या मार्गावर असून जेव्हा एखादा व्यक्ती चुकीच्या मार्गावर असेल तर जनतेची विवेकबुध्दी त्याला पुन्हा योग्य मार्गावर आणेल. त्यामुळे जनतेने आता वरुण गांधींना पराभूत करावे असे आवाहन प्रियंका गांधींनी केलंय.
प्रियंका गांधींच्या टीकेवर वरुण गांधींच्या आई व भाजप नेत्या मनेका गांधी यांनी रविवारी सकाळी प्रत्युत्तर दिले आहे. कोण मार्गावरुन भरकटला हे आता जनताच ठरवेल असे मनेका गांधी यांनी म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.