संजय बारू यांच्या पुस्तकासंदर्भात काँग्रेसचा प्रतिहल्ला

पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारू यांनी "दि ऍक्‍सिडेंटल प्राइम मिनिस्टर : दि मेकिंग अँड अनमेकिंग ऑफ मनमोहनसिंग` हे पुस्तक ऐन निवडणूकीच्या वातावरणात काढून विरोधकांच्या हातात आयतं कोलीतचं दिलंय.

Updated: Apr 13, 2014, 09:09 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारू यांनी "दि ऍक्‍सिडेंटल प्राइम मिनिस्टर : दि मेकिंग अँड अनमेकिंग ऑफ मनमोहनसिंग` हे पुस्तक ऐन निवडणूकीच्या वातावरणात काढून विरोधकांच्या हातात आयतं कोलीतचं दिलंय.
कारण डॉ. मनमोहन सिंग हे पंतप्रधान असून देखील सत्तेपासून दूर होते. कॉंग्रेस सरकारचा रिमोट कंट्रोल कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ताब्यात होता आणि पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना दुय्यम दर्जा देण्यात आल्याचं पुस्कात म्हटलं आहे.

या पुस्तकाचा संदर्भ घेऊन विरोधकांनी काँग्रेसच्या `यूपीए` काळातील कामावर जोरदार हल्ला चढवला. तसेच भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींवर चांगलीच टीका केली.
यानंतर काँग्रेसने देखील संजय बारू यांच्या पुस्तकावर पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली. काँग्रेसचे प्रवक्ता अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले, "यूपीए` सरकारचा विचार केला तर हे श्रमविभागणीचे एक आदर्श उदाहरण असून, मागील दहा वर्षांमध्ये पूर्णपणे परस्पर सामंजस्याने काम करण्यात आले.
तसेच बारूंच्या पुस्तकातील कल्पनाविलासदेखील चांगला नसल्याचे मनु सिंघवी यांनी स्पष्ट केले. तसेच पुस्तकांच्या मुखपृष्ठावरूनच यात केवळ राजकीय गप्पांचा समावेश असल्याचे दिसून येते, असेही त्यांनी नमूद केले. विरोधकांनी या पुस्तकाचे राजकीय भांडवल केल्याबद्दल सिंघवी यांनी टीका केली."
पत्रकार परिषदेत बोलताना पुढे सिंघवी म्हणाले, " `यूपीए`चं सरकार कोसळेल आशी विरोधकांची इच्छा होती. त्यांचा तसा दावा देखील होता. पण सरकारने दोन वेळा आपला कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला. हीच गोष्ट विरोधकांना खटकते आहे. तसेच मागील काही वर्षांत बारू हे भाजप नेत्यांच्या संपर्कात होते. याचा त्यांनी यात एका शब्दानेही उल्लेख केलेला नाही." असे सिंघवी म्हणाले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.