www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
झी मीडिया सदैव सामाजिक बांधलकीचे भान राखून वर्षभर विविध उपक्रम राबवत असतं. या वर्षी दिवाळीत झी २४ तासने प्रदूषण मुक्त दिवाळीचा संकल्प केला आहे. या उपक्रमांतर्गत झी २४ तासने राज्यभरातील विविध शाळांतील सुमारे १ लाख विद्यार्थ्यांकडून फटाके न फोडण्याची शपथ घेतली आहे.
फटाके वाजविल्याने ध्वनी आणि वायू प्रदूषण होते. हे रोखणे ही आपली जबाबदारी आहे. चला आपणही यात सहभागी होऊ या....
या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. आता तुमची वेळ आहे. तुम्हीही या दिवाळीत दीप लावून दिवाळी साजरी करणार का... फटाक्यांच्या खर्चाला फाटा देणार का... प्रदुषण मुक्त दिवाळीच्या या उत्सवात तुम्ही सामील होणार का....
होणार असाल तर आम्हांला कळवा.... खालील प्रतिक्रियाच्या बॉक्समध्ये तुम्ही तुमची प्रतिक्रिया कळवून प्रदुषणमुक्त दिवाळीसाठी तुम्ही काय प्रयत्न करीत आहेत, याची माहिती द्या. आम्ही त्याला प्रसिद्धी देऊ.