www.24taas.com, झी मीडिया, मीरपूर
मीरपूरच्या शेर-ए-बांग्ला स्टेडियमध्ये झालेली मॅच प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारी होतीच... पण, भारतासाठी ही मॅच रेकॉर्ड बनवण्याच्यादृष्टीनंही महत्त्वाची ठरलीय. कारण, या मॅचमध्ये भारतानं आत्तापर्यंत पाकिस्तानच्या नावावर असणारा रेकॉर्ड आपल्या नावावर खेचून आणलाय.
बांग्लादेश विरुद्धच्या दुसऱ्या वनडे मॅचमध्ये बॅट्समनच्या खराब कामगिरीमुळं केवळ १०५ धावांवर ऑलआऊट होणाऱ्या टीम इंडियानं स्टुअर्ट बिन्नी याच्या दमदार बॉलिंगच्या जोरावर मॅच खिशात घातली. बांग्लादेशला केवळ 58 रन्सवर आऊट करून भारतानं आपल्या नावावर एका नवीन रेकॉर्डची नोंद केलीय. भारतानं कमी रन्स उभारूनही तब्बल 47 रन्सच्या फरकानं ही मॅच जिंकली.... आणइ क्रिकेट जगतात सर्वात कमी रन्स करूनही मोठ्या फरकानं विजय आपल्याच पारड्यात नोंदवण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय.
आत्तापर्यंत सगळ्यात कमी रन्स बनवून मॅच आपल्या घशात घालण्याचा रेकॉर्ड पाकिस्तानच्या नावावर होता. पाकिस्ताननं 1989मध्ये भारताविरुद्ध 87 रन्स बनवून केवळ 7 रन्सनं विजय मिळवला होता.
8 डिसेंबर 1992 रोजी वेस्टइंडीज विरुद्ध एका मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानंही 101 रन्सचा बचाव करत विंडीज टीमला 87 रन्सवर ऑलआऊट केलं होतं. तर 2013 मध्ये भारतानं पोर्ट ऑफ स्पेनमध्ये श्रीलंकेविरुद्ध 119 रन्स ठोकले होते. पण, पावसामुळे या मॅचला 29 ओव्हर्सचं करण्यात आलं होतं. भारतानं पहिल्यांदा बॅटींग करत 119 रन्स केले तर श्रीलंका टीम 96 रन्सवर ऑलआऊट झाली होती होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.