चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल, भारत आणि पाऊस

योगायोग म्हणा किंवा काहीही... चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पोहोचला की पाऊस येतोच... आणि त्यानंतर भारताचा विजय ठरलेलाच...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 24, 2013, 08:25 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, बर्मिंगहॅम
योगायोग म्हणा किंवा काहीही... चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पोहोचला की पाऊस येतोच... आणि त्यानंतर भारताचा विजय ठरलेलाच...
२००२ साली श्रीलंकेत झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत नेमका फायनल मॅचला पाऊस आला आणि भारत विरुद्ध श्रीलंका मॅच पावसात वाहून गेली. त्यानंतर राखीव दिवशी भारत विरुद्ध श्रीलंका फायनल पुन्हा खेळवण्यात आली होती. त्या मॅचमध्येही पावसाने हजेरी लावली आणि अखेरीस २००२ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं जेतेपद भारत आणि श्रीलंका यांना संयुक्तपणे वाटण्यात आलं होतं.

त्यानंतर यंदा इंग्लंडमध्ये पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल मॅचला सुरुवात होणार एवढ्यात पावसानं पुन्हा खोडा घालत मॅचमध्ये अडथळा निर्माण केला. मात्र, त्यानंतर झालेल्या रंगतदार मॅचमध्ये टीम इंडियाने इंग्लंडवर पाच रन्सनं विजय मिळवला.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.