www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई
बॉलिवूड अभिनेत्री जूही चावलाच्या भावाचं बॉबी चावलाचं आज सकाळी मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटलमध्ये निधन झालं. ते २०१० पासून कोमात होते. हॉस्पिटलमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
बॉबी चावला बऱ्याच काळापासून गंभीर होते. एप्रिल २०१०मध्ये एका रेस्टॉरेंटमध्ये रात्री जेवत असतांना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आहे. ज्यानंतर ते कोमात गेला. अखेर आज सकाळी सात वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
नुकताच रिलीज झालेला चित्रपट `गुलाब गँग`मधून आपल्या नकारात्मक भूमिकेद्वारे सर्वांच्या कौतुकाची पात्र ठरलेली अभिनेत्री जुही चावला ट्विटरवर म्हणते, `ही सर्वात चांगली पटकथा आहे... माझ्या भावानं मला आयुष्यातलं सर्वात मोठं गिफ्ट दिलंय.... त्यानं चित्रपट पाहिला... आणि..`
गुलाब गँगचे लेखक ओंबर कुरेशीनं बॉबी यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केलाय. त्यांनी ट्विटरवर लिहीलं, "बॉबी चावला हसमुख आणि सर्वांसोबत राहणारे होते. तुम्ही नेहमी आठवत राहाल. मी जूही आणि तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत त्यांच्या दु:खात सहभागी आहोत. देव तुम्हाला या दु:खातून बाहेर पडण्याबाबत शक्ती देईल."
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.