‘बीईंग ह्युमन’ ते ‘बीईंग टायगर’

सलमानचा आगामी चित्रपट एक था टायगर १५ ऑगस्टला रिलीज होतोय. यावेळी त्याच्या टी-शर्टवर `बीईंग ह्युमन` नाही तर ‘बीईंग टायगर’ असं लिहिलेलं होतं.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 14, 2012, 10:24 AM IST

www.24taas.com, मुंबई
‘बीईंग ह्युमन’ ही अभिनेता सलमान खाननं सुरु केलेली एक सेवाभावी संस्था... याच संस्थेच्या माध्यमातून त्यानं अनेक समाजपयोगी कामं केलीत. या संस्थेचं नाव असलेल्या टी-शर्टनं मार्केटमध्येही धूमाकूळ घातला होता. खुद्द सलमान खानंही या संस्थेच्या प्रमोशनसाठी ‘बीईंग ह्युमन’ लिहिलेलं ब्रँडेड टी-शर्ट घातलेला दिसतो. पण, सलमानचा आगामी चित्रपट एक था टायगर उद्या म्हणजेच १५ ऑगस्टला रिलीज होतोय. आता सलमानला प्रमोशन करायचंय ‘एक था टायगर’चं... यासाठी त्यानं टी-शर्टचाच वापर केलाय. पण यावेळी मात्र त्याच्या टी शर्टवर लिहिलेलं होतं... ‘बीईंग टायगर’...
दिल्लीमध्ये रविवारी सलमान खान एक था टायगरच्या प्रमोशनसाठी हजर झाला होता. यावेळी त्याच्या पांढऱ्या टी-शर्ट वर ‘बीईंग टायगर’ अशी अक्षरं लिहिलेली होती. प्रमोशनचा फंडा सलमानला चांगलाच समजलाय तर! पण, यावेळी दिल्लीकरांचा थोडाफार हिरमोड झालाच, कारण यावेळी त्याच्यासोबत कतरिना मात्र नव्हती. याबद्दल सलमानला विचारलं असता, त्याला मात्र हसू आवरता आलं नाही. सलमान खानमध्ये होत असलेला बदल आता लोकांच्याही लक्षात आलाय.
आता काही दिवसांत ‘बीईंग टायगर’ अशी टी-शर्ट मार्केटमध्ये पाहायला मिळाली तर आश्चर्य वाटायला नको!