‘सोनियाच करणार मुख्यमंत्र्याची निवड’

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसच्या विजयाच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री कोण असेल, या प्रश्नावर काँग्रेसचे महासचिव बीरेंद्र सिंग यांनी सोनिया गांधींकडे बोट दाखवलंय.

Dec 20, 2012, 11:30 AM IST

गुजरातमध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी विजयी

गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने निवडणूक निकालामध्ये आघाडी घेतली असताना मणिनगरमधून मुख्यमंत्री नरेंद्र मोदी विजयी झाले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. सलग तिसऱ्यांदा मोदी विजयी झाले आहेत.

Dec 20, 2012, 11:05 AM IST

कोण मारणार बाजी मोदी की भाजप?

कोण मारणार नक्की बाजी या निवडणुकीत? मोदींचा करिश्मा पुन्हा एकदा गुजरातमध्ये दिसून येतो आहे.

Dec 20, 2012, 10:11 AM IST

हिमाचलमध्ये काँग्रेसला बहुमत

हिमाचल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेस ३६ , भाजप २६ तर इतर ६ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसने भाजपला सत्तेवरून खेचून काढले आहे. वीरभद्र सिंह यांची जादू चालली असल्याचे चित्र दिसत आहे.

Dec 20, 2012, 09:55 AM IST

LIVE : विधानसभा निवडणूक २०१२

गुजरातच्या १८२ मतदारसंघांपैकी १३ अनुसूचित जातींसाठी व २६ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत, तर हिमाचल प्रदेशच्या ६८ मतदारसंघांपैकी १७ अनुसूचित जातींसाठी व ३ जमातींसाठी राखीव आहेत.

Dec 20, 2012, 09:30 AM IST

वीरभद्र सिंह यांचा डोळा मुख्यमंत्रिपदावर

हिमाचल विधानसभा निवडणुकांच्या निकालापूर्वीच काँग्रेसचे वरिष्ठ नेता वीरभद्र सिंह यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला असून लोक भावना पाहता काँग्रेस विजयी झाले तर मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड होण्याची शक्यता आहे.

Dec 20, 2012, 09:27 AM IST

गुजरातमध्ये भाजपला २/3 बहुमत मिळेल – अमित शाह

गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाला २/3 असे स्पष्ट बहुमत मिळेल आणि पुन्हा मोदीच सत्तेत येतील, असा दावा माजी गृहराज्य मंत्री आणि नरेंद्र मोदींचे समर्थक अमित शाह यांनी केला आहे.

Dec 20, 2012, 09:14 AM IST

गुजरात - हिमाचल विधानसभा निवडणूक : मतमोजणीला सुरुवात

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालीय. गुजरातच्या १८२ विधानसभा मतदारसंघात ही मतमोजणी होतेय.

Dec 20, 2012, 08:13 AM IST

गुजरातच्या विक्रमी मतदानामुळे मोदी चिंतीत

सोमवारी गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पूर्ण झालं. २० डिसेंबरला लागणाऱ्या निकालाची सगळे आता वाट पाहात आहेत. गुजरातमध्ये यंदा झालेल्या विक्रमी मतदानामुळे सर्व पक्षांनी विचारमंथन सुरू केलं आहे.

Dec 19, 2012, 05:24 PM IST

गुजरातमध्ये उत्साह, ३८ टक्के मतदान

गुजरात विधानसभेच्या मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह दिसून येतोय. दुपारी १ वाजेपर्यंत ३८ टक्के मतदान झालय. ९५जागांसाठी हे मतदान होतय. आज नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांचं भवितव्य मतदार ठरवणार आहेत.

Dec 17, 2012, 02:26 PM IST

गुजरातमध्ये मतदानाला सुरूवात

गुजरातमध्ये आज विधानसभेच्या 95 जागांसाठी मतदान होणार आहे. दुस-या आणि अखेरच्या टप्प्यातील हे मतदान असणार आहे.

Dec 17, 2012, 08:27 AM IST

गुजरातमधील प्रचार संपला, सोमवारी मतदान

गुजरातमधील दुस-या टप्प्यातील मतदानाचा प्रचार काल संपला. प्रचार संपत असल्यानं सगळ्याच पक्षांनी काल रोड शोवर भर दिला होता. उद्या सोमवारी दुस-या टप्प्यात ९५ जागांवर मतदान होणार आहे.

Dec 16, 2012, 11:34 AM IST

मोदी सौदेबाज, गुजरातचा विकास झालाच नाही- राहुल गांधी

काँग्रेसचे युवराज राहुल गांधी गुजरातच्या कुरुक्षेत्रात उतरलेत. गुजरात एक व्यक्ती चालवत नाही या शब्दात मोदींच्या गडावर जाऊन त्यांनी मोदींवर हल्लाबोल केलाय.. तसंच विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोपही राहुल यांनी केलाय.

Dec 11, 2012, 07:55 PM IST

मोदी विरुद्ध सोनिया गांधी यांचा एकमेकांवर हल्लाबोल

गुजरातच्या पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी काँग्रेस आणि मोदींमधील आरोप-प्रत्यारोपांना जोर चढलाय. विशिष्ट समाज आणि भागांचाच विकास केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत असताना, 2017 पर्यंत गुजरातमध्येच राहणार असल्याचा दावा मोदींनी केलाय. यामुळं राजकीय चर्चांना वेग आलाय.

Dec 10, 2012, 09:35 PM IST

नरेंद्र मोदींनी बालपणी घरी आणली होती जिवंत मगर

गुजरातचे विकास पुरूष म्हणून नावाजलेले मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे लहानपणीसुद्धा शूर आणि निडर असल्याचं त्यांचे ज्येष्ठ बंधू सोमाभाई मोदी यांनी सांगितलं. लहानपणी नरेंद्र मोदी घरी जिवंत मगर घेऊन आल्याचं त्यांनी सांगितलं.

Dec 5, 2012, 04:12 PM IST

मोदी सरकारवर आरोपांचा भडिमार

गुजरात विधानसभा निवडणुकीचा भाजपनं जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. त्यात विविध आश्वासनं देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय. तर काँग्रेसनं मोदींविरोधात आरोपपत्र प्रसिद्ध करत त्यांना आरोपीच्या पिंज-यात उभं करण्याचा प्रयत्न केलाय.

Dec 3, 2012, 06:50 PM IST

गुजरात निवडणूक : मोदींना श्वेता भट्ट देणार टक्कर

गुजरातमधले निलंबित आयपीएस अधिकारी संजीव भट यांच्या पत्नी श्वेता भट गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत.

Nov 30, 2012, 01:32 PM IST