वीरभद्र सिंह यांचा डोळा मुख्यमंत्रिपदावर

हिमाचल विधानसभा निवडणुकांच्या निकालापूर्वीच काँग्रेसचे वरिष्ठ नेता वीरभद्र सिंह यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला असून लोक भावना पाहता काँग्रेस विजयी झाले तर मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड होण्याची शक्यता आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 20, 2012, 11:29 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
हिमाचल विधानसभा निवडणुकांच्या निकालापूर्वीच काँग्रेसचे वरिष्ठ नेता वीरभद्र सिंह यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला असून लोक भावना पाहता काँग्रेस विजयी झाले तर मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड होण्याची शक्यता आहे.
पाच वेळा हिमाचल राज्याचे मुख्यमंत्री बनलेल्या वीरभद्र यांनी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती.

आणखी एक टर्म ते राज्याची सेवा करू इच्छितात, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. काँग्रेसची सत्ता आली तर लोकभावना स्पष्ट आहे की कोणाला मुख्यमंत्री करणार, असे सांगून वीरभद्र यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाची दावेदारी सादर केली.
मंडी विधानसभेतून उमेदवार असलेल्या वीरभ्रद यांनी गेल्या आठवड्यात प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. पक्ष चांगली कामगिरी करू शकेल हा या मागील उद्देश होता.