www.24taas.com, शिमला
हिमाचल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेस ३६ , भाजप २६ तर इतर ६ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसने भाजपला सत्तेवरून खेचून काढले आहे. वीरभद्र सिंह यांची जादू चालली असल्याचे चित्र दिसत आहे.
भाजपला गेल्या विधानसभेच्या तुलने १५ जागांचे नुकसान झाले आहे. तर काँग्रेसला १३ जागांचा फायदा आहे. भाजपच्या २ जागा अपक्षांच्या पारड्यात पडलेल्या दिसतात.
सत्ताधारी भाजपला काँग्रेसने धोबीपछाड केल्याचे चित्र दिसत आहे.
सकाळी १०.२५ वाजता : विधानसभेच्या सगळ्या म्हणजे ६८ जागांचे निकाल हाती | हिमाचल प्रदेश : काँग्रेस ३८ , भाजप २३, इतर ७
सकाळी १०.०६ काँग्रेसची विजयाकडे वाटचाल | ३६ जागांवर आघाडीवर |
सकाळी ९.५५ वाजता : हिमाचल प्रदेश : हिमाचलमध्ये काँग्रेसला बहूमत | हिमाचलमधली सत्ता भाजप गमावणार | हिमाचल प्रदेश : काँग्रेस ३५, भाजप २०, इतर ६
हिमाचल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत काँग्रेस २९ , भाजप २३ तर इतर ४ जागांवर आघाडीवर होते. ६८ विधानसभा जागांमध्ये वीरभद्र सिंह यांची जादू चालली असल्याचे चित्र सुरवातीला तरी दिसत आहे.
भाजपचे मुख्यमंत्री हमीरपूर येथे प्रेम कुमार धुमल यांनी आघाडी घेतली.
हिमाचल प्रदेशच्या ६८ जागांसाठी आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली. संपूर्ण राज्यात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारे मतदान करण्यात आले. भाजप पुन्हा बहुमत मिळवून एक नवा रेकॉर्ड बनवते का विरोधी पक्षात असलेली काँग्रेस सत्ता परिवर्तन करते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.