नॉस्त्रेदमसचं तिसऱ्या महायुद्धावरील भविष्य!

१४ डिसेंबर १५०३ रोजी फ्रांसमध्ये जन्मलेल्या नास्त्रेदमसने तिसऱ्या महायुद्धाबद्दल भविष्यवाणी केली होती. त्याने मांडलेल्या जगाच्या भविष्यातील बहुसंख्य घटना खऱ्या ठरल्या आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 8, 2013, 05:25 PM IST

www.24taas.com, पॅरिस
उत्तर कोरिआ आणि अमेरिकेतील एकमेकांविरोधात सुरू असणारी युद्धाची तयारी ही तिसऱ्या महायुद्धाची सुरूवात असल्याचं मानलं जात आहे. जपान अमेरिकेला साथ देत आहे, तर अरब राष्ट्र, इराण आणि चीन उत्तर कोरियाच्या बाजूने उभे आहेत. भारत आणि रशियाने आपली स्थिती स्पष्ट केलेली नाही.
१४ डिसेंबर १५०३ रोजी फ्रांसमध्ये जन्मलेल्या नास्त्रेदमसने तिसऱ्या महायुद्धाबद्दल भविष्यवाणी केली होती. त्याने मांडलेल्या जगाच्या भविष्यातील बहुसंख्य घटना खऱ्या ठरल्या आहेत. ९/११ची घटनाही त्याने १६ व्या शतकात मांडली होती. नास्त्रेदमसने वर्तवलेलं तिसऱ्या महायुद्धाचं भविष्य भयानक आहे. या युद्धात तीन समुद्रांनी वेढलेल्या देशाचा एक नेता असेल, ज्याचं नाव जंगली प्राण्याशी संबंधित असेल. भारत देश असा तीन समुद्रांनी वेढलेला देश आहे. आणि सध्याच्या पंतप्रधानांच्या नावात असलेलं ‘सिंह’ हे नास्त्रेदमसच्या भविष्याची यथार्थता पटवून देत असल्याचं वाटत आहे.

यापूर्वी एका देशात जनक्रांती होऊन नवा नेता उभा राहील. (ही गोष्ट इजिप्तमध्ये घडली आहे.) वेगळ्याच देशातील नवा पोप निवडला गेला आसेल. (नुकतेच निवडले गेलेले पोप हे पहिले युरोपबाहेरील देशातून निवडले गेलेले पोप आहेत.) मंगोल चर्चविरोधात लढतील. (चीन अमेरिकेशी युद्धाच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे.) नवा धर्म (इस्लाम) चर्च विरोधात रक्तपात करत इटलीपर्यंत पोहोचेल आणि तिसऱं महायुद्ध सुरू होईल. असं नास्त्रेदमसने आपल्या ग्रंथात लिहिलेलं आहे.