उल्हासनगरमध्ये सट्टेबाजांना अटक

उल्हासनगरमध्ये भारत पाक क्रिकेट मॅचवर सट्टा लावणा-या दोन सट्टेबाजांना पोलिसांनी अटक केलीय. राजेश नागदेव आणि पंकज भाटीया अशी या दोघांची नावं आहेत.

Updated: Mar 19, 2012, 08:12 AM IST

www.24taas.com, ठाणे

 

उल्हासनगरमध्ये भारत पाक क्रिकेट मॅचवर सट्टा लावणा-या दोन सट्टेबाजांना पोलिसांनी अटक केलीय. राजेश नागदेव आणि पंकज भाटीया अशी या दोघांची नावं आहेत. बांग्लादेशमध्ये मिरपूर येथे भारत पाक यांच्या मॅच अतितटीची झाली. यात भारताने पाकली ६ विकेट राखून धूळ चारली.

 

एशिया कपमधील भारत-पाक मॅचवर सट्टा खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उल्हासनगरच्या कॅम्प-४मध्ये असलेल्या सेक्टर ३०मधील एका घरावर पोलिसांनी छापा मारला. यावेळी पोलिसांनी या दोन सट्टेबाजांना अटक केली. शिवाय पोलिसांनी त्यांच्याकडून ९ मोबाईल आणि एक लॅपटॉप जप्त केला आहे. आजही खुलेआम सट्टा लावला जात असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.