मनसेचा नाशिक वचपा ठाण्यात?

ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होणार आहे. पालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात स्थायी समितीसह परिवहन समिती सदस्य पदाकरीता सोमवारी निवडणूक होईल.

Updated: Mar 19, 2012, 07:45 AM IST

www.24taas.com, ठाणे

ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होणार आहे. पालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात स्थायी समितीसह परिवहन समिती सदस्य पदाकरीता सोमवारी निवडणूक होईल.

सकाळी अकरा वाजता ही निवडणूक होईल. मनसेनं पाठिंबा दिल्यामुळेच महायुतीनं महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक जिंकली होती. मात्र नाशिकमध्ये शिवसेनेनं मनसेला महापौरपदासाठी पाठिंबा दिला नाही. त्यामुळं राज ठाकरेंनी उघड नाराजी व्यक्त केली होती. आता स्थायी समितीसारख्या महत्वाच्या निवडणुकीत मनसे काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

मनसेनं आघाडीला पाठिंबा दिला तर महायुती आणि आघाडीचं संख्याबळ समान होईल. शिवसेनेचे सात, भाजपचा १, राष्ट्रवादीचे ५, काँग्रेस २ आणि मनसेचा १ उमेदवार निवडणून येईल, असं चित्र आहे. आघाडीला पाठींबा देण्याकरीता मनसे सदस्यांनी कोकण भुवन इथं पत्र दिल्यामुळं चिठ्ठया उडवून देखील स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक होऊ शकते. तर परिवहन समितीच्या सहा जागांकरीता १० जणांनी अर्ज दाखल केले आहेत.