उत्तर भारतात शीतलहरीमुळे १४० जणांचा मृत्यू

उत्तर भारतात शीत लहरीने हाहाकार माजवला आहे. उत्तर भारतात अनेक ठिकाणी दाट धूकं आणि कमी प्रकाशमानामुळे जनजीवन विस्किळत झालं आहे तसंच रेल्वे आणि विमान वाहतूकीवर अनेक भागात परिणाम झाला आहे

Updated: Jan 9, 2012, 06:15 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

उत्तर भारतात शीत लहरीने हाहाकार माजवला आहे. उत्तर भारतात अनेक ठिकाणी दाट धूकं आणि कमी प्रकाशमानामुळे जनजीवन विस्किळत झालं आहे तसंच रेल्वे आणि विमान वाहतूकीवर अनेक भागात परिणाम झाला आहे. शीत लहर आणि बर्फवृष्टी झाल्याने किमान १४० लोकं मृत्यूमुखी पडले. काश्मिर खोऱ्यात गोठण बिंदूच्या खाली तापमान गेल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. त्यातच काश्मिरमध्ये वीजेच्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे. काश्मिरात दोन लोकांचा कडाक्याच्या थंडीने दोघांचा मृत्यू झाला.

 

पंजाब, हरियाना आणि चंदीगडमध्ये दाट धुक्याच्य आवरणामुळे जनजीवन प्रभावीत झालं आहे. हिमाचल प्रदेशात कांगडात तापमान उणे चार डिग्री से तर मनाली उणे सात डिग्री इतकं खाली घसरलं. धरमशाला चार फूटापर्यंत बर्फवृष्टी झाली. दिल्लीतही किमान तापमान ६ डिग्री पर्यंत खाली घसरलं. गेल्या काही दशकात पठाणकोट मध्ये पहिल्यांदाच बर्फवृष्टी झाली. उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये  धक्यामुळे रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळित झाली.