धक्कादायक! अल्पवयीन प्रेयसीला लॉजवर नेलं आणि प्रियकराने... वसईतल्या घटनेने खळबळ

अल्पवयीन मुलीला लॉजमध्ये प्रवेश कसा दिला? लॉज मालकाची होणार चौकशी

Updated: Apr 14, 2022, 12:42 PM IST
धक्कादायक! अल्पवयीन प्रेयसीला लॉजवर नेलं आणि प्रियकराने... वसईतल्या घटनेने खळबळ title=

प्रथमेश तावडे, झी मीडिया, वसई : वसईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियसीची हत्या करुन प्रियकराने आत्महत्या केल्याची घटना वसईल्या कळंब गावात उघडकीस आली आहे. 

वसईच्या कळंब गावातील एका लॉजमध्ये अल्पवयीन तरुणीची प्रियकराने गळा आवळून हत्या केली. वसईच्या कळंब इथल्या हार्दिक या लॉज मध्ये हा प्रकार घडला आहे. हत्येनंतर फरार झालेल्या प्रियकरानेही ट्रेनखाली आत्महत्या केली आहे. अभिषेक शहा ( वय 21) असं या तरुणाचं  नाव आहे.

बुधवारी दुपारच्या सुमारास तरुण तरुणी हार्दिक लॉज मध्ये आले होते. त्यानंतर काही वेळाने तरुण जेवण आणण्यासाठी बाहेर गेला मात्र परतलाच नाही. त्यामुळे लॉज चालकाने खोलीत जाऊन पाहिले तेव्हा तरुणी मृतावस्थेत पडली होती. लॉज मालकाने याची माहिती पोलिसांना दिली. 

याबाबतची माहिती अर्नाळा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस या फरार झालेल्या आरोपीचा शोध घेत होते. मात्र फरार झालेल्या तरुणाने ट्रेनखाली आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

मयत तरुणी ही अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे तिला लॉजिंग मध्ये प्रवेश कसा दिला? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. मात्र या घटनेवरून कळंब गावात लॉजिंगच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केलं जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलीला लॉज मध्ये प्रवेश देणाऱ्या या लॉज चालकांवर पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष आहे..

सव्वा महिन्यात वसईत ही दुसरी घटना घडली असून यापूर्वी वसईतील स्टेटस लॉज मध्ये प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या केली होती त्यानंतर उत्तरप्रदेशात जाऊन त्याने स्वतःचंही जीवन संपविलं होतं.