गोल्डन गाऊनवर मंगळसूत्राचं ब्रेसलेट: राधिका मर्चंटचा लूक मॉडर्न सुनांसाठी उत्तम पर्याय!

राधिका मर्चंटने ख्रिसमसच्या पार्टीत गोल्डन गाउनवर मंगळसूत्राचं ब्रेसलेट घातलं होतं. या लूकमुळे राधिका चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चेत आली आहे. 

Updated: Jan 1, 2025, 04:15 PM IST
गोल्डन गाऊनवर मंगळसूत्राचं ब्रेसलेट: राधिका मर्चंटचा लूक मॉडर्न सुनांसाठी उत्तम पर्याय! title=

अंबानी कुटुंबाची सून राधिका मर्चंट ही नेहमी तिच्या जबरदस्त, हटके लूक्ससाठी ओळखली जाते. अगदी छोट्या समारंभापासून ते तिच्या आलिशान लग्नापर्यंत, तिचे आउटफीट चर्चेचा विषय ठरले होते. तिच्या फॅशनमधील आवडी निवडी चाहत्यांना नेहमीच आकर्षित करतात. 2024 या वर्षात तर तिच्या अनोख्या आणि स्टायलिश पोशाखांमुळे फॅशन क्षेत्रात तिने स्वत:ची छाप सोडली आहे. प्री-वेडींग आणि लग्नाच्यावेळी परिधान केलेल्या आउटफिट्सने तिने सर्वांना थक्क तर केलंच आहे. परंतु, आता ती तिच्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा वेगवेगळे पोशाख परिधान करत सर्वांचे लक्ष वेधून घेत असते.

अशाच एका कार्यक्रमात राधिकाने काळ्या रंगाच्या गाउनवर तिचं मंगळसूत्र ब्रेसलेट म्हणून हातात घातलं होतं. तेव्हा तिच्या फॅशन सेन्सची वेगळीच चर्चा रंगू लागली. मंगळसूत्रासारख्या पारंपारिक दागिन्याला ब्रेसलेटचा मॉडर्न टच देत राधिका चाहत्यांमधील नवीन ट्रेंड्सना कारणीभूत ठरत आहे. हेच मंगळसूत्राचं ब्रेसलेट तिने पुन्हा एकदा ख्रिसमसच्या सेलिब्रेशनच्या वेळी घातलं होतं. ज्यामुळे तिच्या फॅशनविषयीच्या चर्चेला आणखी उधाण आलं.

अंबानी कुटुंबीच्या ख्रिसमस पार्टीत राधिका मर्चंट खास लूकमध्ये दिसली. या पार्टीमध्ये फक्त कुटुंबीयच नव्हे तर मित्रपरिवार सुद्धा सामिल होता. यावेळी राधिका मर्चंटने प्रसिद्ध डिझाइनर रिमझिम बाबू यांच्या कलेक्शनमधील गोल्डन गाउन परिधान केला होता.  या गाउनमध्ये मेटलच्या दोऱ्यांचे बारीक काम पाहायला मिळाले. डिझायनरने आकर्षित लूकसाठी घेतलेली मेहनत राधिकाने परिधान केलेल्या गोल्डन गाउन मध्ये दिसते. स्लीवलेस आणि डीप नेकलाइन असलेला गाउन संध्याकाळच्यावेळी असलेल्या कार्यक्रमासाठी परफेक्ट ठरला.

 

या गाउनला कॉम्लीमेन्ट म्हणून गाउनवर स्टाइलिश मरून रंगाचं स्वेटर तिने परिधान केलं होतं. यावर आकर्षक ज्वेलरीसुद्धा राधिकाने घातली होती. डायमंडचे कानातले, बोटांमधील अंगठ्या आणि मनगटातील ब्रेसलेटप्रमाणे घातलेलं मंगळसूत्र तिच्या या स्टायलिश लूकची शोभा आणखी वाढवत होते. 

राधिकाचा पारंपारिक लूक चाहत्यांना फार आवडतो. मुंबईतील NAMCC आर्टस् कॅफेच्या लॉंचच्यावेळी तिने घातलेला ड्रेस आणि त्यावरील तिचे दागिन्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. काळ्या रंगाच्या फुलांची नक्षी असलेल्या ड्रेसवर तिने घातलेले लहान कानातले आणि हातातील मंगळसूत्र आकर्षित वाटत होते.